रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): जांबुत (ता. शिरुर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पूजा नरवडे हिच्या कुटुंबियांची जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी भेट घेतली.
नरवडे कुटूंबियांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासंदर्भात संबंधित वन अधिकारी सातपुते तसेच म्हसेकर यांच्या सोबत चर्चा केली असता वनविभागाकडून 10 लाख रुपयांची मदत मिळाली असुन परत 10 लाख देणार असल्याचे सांगत लवकरात लवकर बिबट्याचा शोध लावून जरेबंद करण्यासाठी सुचना दिल्या.
यावेळी वाघाळे गावचे माजी सरपंच पप्पू भोसले, जांबुत गावचे सरपंच दत्ता दुरी, सेवा निवृत्त ग्रामविकास अधिकारी उत्तम जगताप, सोसायटी संचालक शरद राणे, शिरुर तसेच जुन्नर चे वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासन जरी युद्ध पातळीवरती काम करत असेल तरीही पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी वनविभागाने काळजी घ्यावी, असे जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी सांगितले.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…