डॉक्टरांच्या कार्याची दखल घेणे गरजेचे: हेमंत शेडगे

वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेकडून डॉक्टरांचा सन्मान

शिक्रापूर: प्रत्येक ठिकाणी डॉक्टर हे जीवाची बाजी लावून नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटत असतात. कोरोना काळामध्ये देखील सर्व डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्याचे आपण पाहिले असून डॉक्टरांच्या कार्याची दखल घेणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केले.

unique international school

शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामीण रुग्णालय येथे वन्य पशू पक्षी संरक्षण सामाजिक संस्था शिरूर तालुक्याच्या वतीने राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने डॉक्टरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे बोलत होते, याप्रसंगी विद्युत वितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, उपसरपंच मयूर करंजे, धानोरे ग्रामपंचायत सदस्या वैशालीताई येवले, खरेदी विक्री संघाचे राजेंद्र नरवडे, वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे, सचिव शेरखान शेख, बाळसाहेब मोरे, अमोल कुसाळकर, नितीन वाळिंबे, उद्योजक अमित राऊत, सचिन धुमाळ, प्रवीणकुमार जगताप, एन, बी. मुल्ला यांसह ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी यांसह आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्चना शेडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशिद, डॉ. हेमा देठे, डॉ. रवींद्र टेमगीरे, डॉ. अजिंक्य तापकीर, डॉ. नितीन सोनवणे, डॉ. प्रदीप थोरात, डॉ. पवन सोनवणे, डॉ. शरद लांडगे, डॉ. राजीव कोपुळवार, डॉ. भाऊसाहेब पोळ, डॉ. दिपक पाटील, डॉ. धनंजय खेडकर, डॉ. किरण चपाई, डॉ. अविनाश रुके, डॉ. चंद्रकांत केदारी, डॉ. सोनाली लांडगे, डॉ. सुप्रिया गावडे, डॉ. स्मिता टेमगीरे, डॉ. सुहास निकम, डॉ. संदीप वाव्हळ यांचा पुरस्कार देत विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी डॉक्टर हे आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत नागरिकांना आरोग्य सेवा देत असताना डॉक्टरांच्या बाबत प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान असावे, असे विद्युत वितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी सांगितले, तर यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्चना शेडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजिनाथ काशिद, डॉ. पवन सोनवणे, डॉ. शरद लांडगे, डॉ. रवींद्र टेमगिरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविणकुमार जगताप यांनी केले, स्वागत प्रा. एन. बी. मुल्ला यांनी केले प्रस्तावित सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले तर श्रीकांत भाडळे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

2 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

14 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

15 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago