शिरूर तालुका

कवठे येमाई – मलठण रस्त्यावर अपघातात एकाचा जागीच मृत्यू…

अष्टविनायक महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच

शिरुर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई – मलठण रस्त्यावरील रावडेवाडी हद्दीत शिवाजी मारुती जाधव (वय ६५) रा. पिंपरखेड यांच्या टू व्हीलरला अज्ञात वाहणाने जोरदार धडक दिल्याने शिवाजी जाधव यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तश्राव होऊन त्यांचा या अपघातात जाग्यावरच मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहन घटनास्थळावरून पळून गेले आहे.

शिवाजी जाधव हे पिंपरखेडवरुन कवठे मार्गे शिक्रापूरला आपल्या मुलीकडे भेटायला होंडा शाईन मोटार सायकल क्रं एम. एच १४ ई.टी. ६५३९ या गाडीवरून चालले होते. अष्टविनायक रस्त्यावर रावडेवाडी येथील पराग अॅग्रो साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हा अपघात झाला आहे. शाईन गाडीचा पुर्णपणे चक्काचूर झाला आहे.

सदर ठिकाणी तीव्र उतार असल्याने कवठ्याच्या बाजूने येणारी वाहने दिसत नाही. तसेच सदर ठिकाणी कारखान्याकडे जाण्यासाठी रस्ता असल्याने वळण घेताना अपघात होत आहे. घटनास्थळी पोलिस कॉन्स्टेबल विशाल पालवे, दामूशेठ घोडे, राजेंद्र गावडे, डॉ. सुभाष पोकळे, दिपक रत्नपारखी, बाळासाहेब डांगे यांनी भेट दिली असून मयताची डेडबॉडी पुढील कारवाईसाठी शिरूर पोलिस स्टेशन येथे हलवण्यात आली आहे.

नुकतेच अष्टविनायक रस्त्याचे काम पुर्ण झाले असून वाहने भरधाव वेगाने पळत आहे. वाहन चालकांनी शिस्तीने वाहने चालवणे गरजेचे असून स्पीड बेकर बसवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता गडदरे, सरपंच भाऊसाहेब किठे, व नागरीकांनी केली आहे.

याच अष्टविनायक रस्त्यावर भाऊसाहेब चव्हाण रा. शिरसगाव काटा यांचा (दि. २२) एप्रिल रोजी टू व्हीलरवर शिंदेवाडीतील पीराचा दर्गा येथे अपघातात जागीच मृत्यू झाला होता. या अष्टविनायक रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू असून या रस्त्यावर अनेक जणांचे जीव केले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

53 मिनिटे ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

2 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

3 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

19 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

23 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

23 तास ago