शिरूर तालुका

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील माजी सनदी आधिकारी विधानसभा लढवणार असल्याची जोरदार चर्चा

शिरुर (अरुणकुमार मोटे) राज्यात लोकसभेपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्या दृष्टीने अनेक इच्छुक उमेदवार आपली ताकद आजमावुन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामध्ये शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील एक माजी सनदी आधिकारी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची जोरदार तयारी करत आहे. घोडगंगा कारखाना बंद असल्यामुळे तेथील शेतकरी, कामगारवर्ग तसेच विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यावरील नाराज गट आपल्याकडे वळतील अशी आशा या अधिकाऱ्याला वाटत आहे.

 

त्यामुळे भविष्यकाळामध्ये आमदार अशोक पवार यांना त्यांच्याच भागातुन आव्हान उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा शिरूर तालुक्यात चांगलीच रंगली आहे. सदर सनदी अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित दादा गटाकडुन लढण्यास इच्छुक आहे. तर दस्तूर खुद्द अजित पवार हे अशोक पवार यांच्या विरोधात लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा शिरुर तालुक्यात चांगली रंगली आहे.

 

नुकतेच अजित पवार हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रांजणगाव गणपती येथे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी रांजणगाव, शिरुर परिसरातील नागरिकांबरोबर वेळ घालवत समस्या जाणुन घेऊन संवाद साधला आहे. एकुणच आगामी विधानसभा ही फारच अटीतटीची होणार असल्याची चर्चा शिरुर-हवेली मतदारसंघात होत आहे.

शिरुर तालुक्यातील सर्व प्रवर्ग दिव्यांगासाठी महाराजस्व अभियान राबवणार; बाळासाहेब म्हस्के

रांजणगाव येथील महागणपती मंदिरात संकष्ट चतुर्थी निमित्त सामुहिक अथर्वशीर्ष पठण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या माईनगरी शिरुर येथील आश्रमाला सदिच्छा भेट

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

20 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

22 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago