शिरूर तालुका

पाबळला कंटेनर मधून पत्र्याचे रोल पडून मोठा अपघात

सुदैवाने जीवित हानी नाही मात्र दूध डेअरी सह वाहनांचे नुकसान

शिक्रापूर: पाबळ (ता. शिरुर) येथे बेल्हा जेजुरी या मुख्य रस्त्यावर एका कंटेनर मधून वाहतूक करण्यात येत असलेले तब्बल २२ टन वजनाचे २ पत्र्याचे रोल रस्त्यावर पडून अपघात होऊन येथील दूध डेअरी सह काही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथे बेल्हा जेजुरी या मुख्य रस्त्यावर पहाटेच्या सुमारास अवजड असे पत्र्याचे रोल घेऊन एम एच ४६ ए आर ४२९४ हा कंटेनर शिरुर बाजूने खेड सेझ येथे जात होता. सदर कंटेनर हा पाबळ येथे मुख्य चौकामध्ये आला असता त्याचा ताबा सुटून कंटेनर जागेवर पलटी झाला. यावेळी कंटेनर मधील १ पत्र्याचा रोल रस्त्यालगत असलेल्या दूध डेअरीला धडकला तर १ रोल शेजारीच असलेल्या हॉस्पिटलला धडकला.

यावेळी दूध डेअरीचे सह डॉक्टरांच्या खाजगी वाहनाचे तसेच काही रुग्णांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने सदर घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दिवसभर या रस्त्यावर मोठ्या प्रमानावर नागरिक व वाहनांची वर्दळ असते मात्र पहाटेच्या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला गेला असून घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी सदर घटनास्थळी धाव घेत पंचांनाम केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

13 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

13 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

13 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

17 तास ago