शिरूर तालुका

सार्वजनिक बांधकाम यांच्या दुर्लक्षपणामुळे अन्नापुरातील निकृष्ट सिमेंट रस्त्याचे काम अखेर दुबार

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अन्नापुर गावठाणातील (रंगाअण्णा पवार यांच्या घरासमोरून अंगणवाडीकडे) जाणाऱ्या दहा लाखांचा निधी असलेल्या सीमेंट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे निकृष्ट झाल्याबाबत “सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज” यांनी सा.बां. उपविभागाकडे वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून, तसेच फोन/व्हॉट्स ॲप याद्वारे , जवळपास एक वर्षाहून अधिक पाठपुरावा केला होता.

या तक्रारीची दखल घेऊन सा.बां.शिरुर उपविभागाचे सहाय्यक अभियंता अनिल जाधव यांनी स्थळ पाहणी केली होती. आणि निकृष्ट काम ठेकेदाराकडून पुन्हा करण्याचे निर्देश दिले होते. मुळातच हे काम होताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निगराणी खाली होत असते हे अधिकारीच पुणे येथे राहावयास असून त्यांचे कोणत्याच कामाकडे लक्ष नसते त्यामुळे या भागातील अनेक कामे निकृष्ट पद्धतीने होत आहे. वाळुंज यांचा या कामाविषयी सातत्याने पाठपुरावा सुरू होता अखेर नुकतेच सदर काम पुनः करण्यात आले आहे, ही जनहितासाठी महत्त्वाची बाब आहे.

“रस्ता पुन्हा करण्यात आल्याने समाधान आहे; परंतु यासाठी पाठपुराव्यामध्ये जनतेचा मौल्यवान वेळ वाया जातो, अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्यास सर्व सार्वजनिक कामे नियम, तांत्रिक निकष आणि शास्त्रीय पद्धतीनुसार गुणवत्तापूर्ण होतील. जेणेकरून नंतर पच्छाताप होणार नाही. निकृष्ट कामे देशाच्या विकासाला बाधा ठरतात. बांधकाम विभागांनी ‘शासन निर्देशांचे काटेकोर पालन’ करून त्याप्रमाणे कामांपूर्वी फलक लावणे व गुणवत्ता तपासणीवर कठोर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जिथे दुर्लक्ष किंवा गैरप्रकार दिसतील, तिथे जागरूक नागरिक म्हणून आम्ही गप्प बसणार नाही.” या भागात निकृष्ट कामे होतील अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

निलेश मंदा यशवंत वाळुंज

(सामाजिक कार्यकर्ता / व्हिसल ब्लोअर)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

9 तास ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

16 तास ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

18 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

18 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

18 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

1 दिवस ago