शिरूर तालुका

पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशी व नागरिक त्रस्त

सलग ३ दिवस करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर रस्ता वाहतूक कोंडीने नेहमीच चर्चेत येत असणारा रस्ता असून मागील काही महिन्यांमध्ये या रस्त्याची वाहतूक कोंडीची ओळख पुसली जात असताना आता पुन्हा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे शिक्रापूरसह परिसरातील नागरिक व वाहन चालक या वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मुख्य चौक तसेच पुणे नगर रस्ता वाहतूककोंडी मुळे संपूर्ण राज्यात गाजलेला रस्ता आहे. यापूर्वी अनेकदा सदर रस्त्याचा विषय विधानसभेत देखील गाजला गेला. कित्येकदा पुणे नगर रस्ता रुंदीकरणाबाबत देखील चर्चा झाल्या. पुणे नगर रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीत कित्येकदा आमदार, खासदार व मंत्री देखील अडकले गेलेले आहेत. अनेक वर्षांपासून पुणे नगर रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.

सध्या पावसाच्या दिवसांमुळे काही ठिकाणी खड्डे व पाणी साचल्यामुळे देखील सध्या वाहतूक कोंडी वाढत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांमुळे देखील पुणे नगर रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीत अजूनही भर पडत असून पुणे नगर रस्त्यावरील शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भिमा, रांजणगाव, कोंढापुरी, लोणीकंद, वाघोली येथे मुख्य चौकात वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत आहेत. वाहनांच्या ३ ते ४ किलोमीटर पर्यंत रांगा लागत असल्यामुळे वाहतूक कोंडी विस्कळीत होत आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद देवरे, गणेश शेडे, राकेश मळेकर, ज्ञानदेव गोरे, सहदेव ठुबे, जितेंद्र मांडगे, अंबादास थोरे, राजेंद्र घनवट यांसह वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी वाहतूक कोंडी सोडविण्याचे प्रयत्न करत असताना देखील वाहतूक कोंडी सोडविणे पोलिसांना मुश्कील झाले आहे.

मात्र वाहनांची संख्या जास्त आणि रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनांच्या रांगा ४ ते ५ किलोमीटर पर्यंत पोहचत आहेत. परंतु पुणे नगर रस्त्यावरील स्थानिक नागरिक, ग्रामस्थ व व्यापारी यांना सदर वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. त्यामुळे पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटून स्थानिकांना मोकळा श्वास घेता यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक व ग्रामस्थ करत आहे.

पाच मिनिटाच्या अंतराला एक तास…
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडी मुळे एक किलोमीटर अंतरावरील अंतरावर प्रवास करण्यासाठी ५ मिनिटे लागत असताना सध्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ५ मिनिटाचे अंतर प्रवास करण्यासाठी १ तास वेळ लागत असल्याचे दिसून येत आहेत.

रुग्णवाहिकांना देखील वाहतूक कोंडीचा फटका…
पुणे नगर रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये अनेक वाहने अडकत असताना ठिकठिकाणच्या रुग्णालयातून पुणे येथे उपचारासाठी रुग्ण घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका सुद्धा या वाहतूक कोंडीत अडकत आहेत. त्यामुळे त्या रुग्नावाहीकांच्या सायरनच्या आवाजाचा त्रास नागरिकांना होत असताना रुग्णवाहिकांना देखील वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे व रुग्णांना जीव गमविण्याची वेळ येत आहे.

कासारी फाटा येथील बायपास सोयीस्कर…
पुणे नगर महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांना पुणे कडे जाण्यासाठी कासारी फाटा येथून तळेगाव ढमढेरे मार्गे सणसवाडी, अहमदनगर कडे जाणाऱ्या वाहनांसाठी सणसवाडी तळेगाव मार्गे कासारी फाटा हून अहमदनगर तसेच चाकणला जाण्यासाठी देखील सदर रस्ता सोयीस्कर होत आहे. मात्र वाहन चालकांना माहिती नसल्याने येथील रस्ताच वापर होत नाही. मात्र हा रस्ता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खूप सोयीस्कर आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago