Crime
शिक्रापूर: टाकळी भीमा (ता. शिरुर) येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सचिन सुखदेव माहूलकर याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील सचिन माहूलकर व श्वेता माहूलकर यांच्यात घरगुती वादातून भांडणे होत असत. रक्षाबंधनच्या दिवशी श्वेता घरात असताना सचिन याने तिला घरगुती वादातून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान सचिन याने चुलीसमोरील लाकूड घेऊन श्वेताला मारहाण करत जखमी केले.
याबाबत श्वेता सचिन माहूलकर (वय २३) रा. टाकळी भीमा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सचिन सुखदेव माहूलकर (वय २३) रा. टाकळी भीमा (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…