शिरूर तालुका

शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या सभापतीपदी राजेंद्र नरवडे, उपसभापतीपदी बाळासाहेब नागवडे बिनविरोध

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या सभापतीपदी महायुतीचे राजेंद्र नरवडे, तर उपसभापतीपदी बाळासाहेब नागवडे यांची बिनविरोध निवड झाली असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांनी केली. या निवडीनंतर परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे की, चेहरे तेच फक्त पक्ष बदल.

महायुतीचा वरचष्मा कायम

खरेदी-विक्री संघावर महायुतीचा प्रभाव राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा फायदा झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार अशोक पवार यांच्या चार समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अशोक पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

बिनविरोध निवडणुकीची प्रक्रिया

आज (२४ मार्च) सकाळी ११ ते ११:३० दरम्यान, सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची वेळ होती. राजेंद्र नरवडे आणि बाळासाहेब नागवडे यांच्याच उमेदवारी अर्जाची नामनिर्देशन पत्रे आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष अण्णा महाडिक यांनी बंद लिफाफ्यात दोन नावे आणली होती. त्यानुसार, सभापतीपदी राजेंद्र नरवडे, तर उपसभापतीपदी बाळासाहेब नागवडे यांची नावे निश्चित करण्यात आली.

महायुतीच्या नेत्यांचे परिश्रम

ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील, राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, मानसिंग पाचुंदकर, तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे, बाजार समितीचे माजी संचालक आबाराजे मांढरे, भाजपा माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे, राजेंद्र कोरेकर, माजी सभापती शरद कालेवार, माजी सरपंच प्रकाश थोरात, श्रीनिवास घाडगे, आणि श्रुतिका झांबरे यांनी मेहनत घेतली.

अशोक पवार यांच्यावर टीका

ही निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नेत्यांनी माजी आमदार अशोक पवार यांच्यावर टीका केली. तसेच, त्यांच्या चार समर्थकांनी पक्ष सोडल्याने त्यांची अधिक गोची झाली.

महायुतीचा पुढील निर्धार

या निकालानंतर महायुतीने बाजार समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही एकजूट दाखवून विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र राहून पुढील निवडणुकीत विजय मिळवण्याचे लक्ष्य ठरवले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी माजी आमदार अशोक पवार यांना थेट सवाल केला – “निवडणुकीच्या दिवशी सभापती आणि उपसभापती कोण हे समजेल, अशी भीम गर्जना करणारे अशोक पवार आता शांत का?” तसेच, आगामी सर्व निवडणुकांमध्ये महायुतीचाच झेंडा फडकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

21 मिनिटे ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

29 मिनिटे ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

31 मिनिटे ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

35 मिनिटे ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

40 मिनिटे ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

45 मिनिटे ago