शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात भरधाव कंटेनर ट्रकच्या धडकेत तिघांचा मृत्यू, एक जखमी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे भरधाव कंटेनर ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात 23 मार्च 2025 रोजी रात्री 7.30 वाजता तळेगाव ढमढेरे-न्हावरे रस्त्यावर संदीप महादेव सरके यांच्या घरासमोर घडला.

अपघाताची सविस्तर हकीकत, मृत कैलास कृष्णाजी गायकवाड (49) हे त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार (MH-16 CV-4176) मधून त्यांच्या कुटुंबीयांसह वाघोली (पुणे) येथून न्हावरेकडे येत होते. कारमध्ये त्यांची पत्नी दुर्गा कैलास गायकवाड (45), मुलगी गौरी कैलास गायकवाड (20) आणि चुलत मेहुणा गणेश महादेव नेर्लेकर (23, रा. कोकणगाव, श्रीगोंदा) हे प्रवास करत होते.

न्हावरे गावच्या हद्दीत आल्यानंतर समोरून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर ट्रक (NL-05 G-2396) ने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कैलास गायकवाड, त्यांची मुलगी गौरी गायकवाड आणि गणेश नेर्लेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुर्गा गायकवाड या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर कंटेनर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अपघाताची नोंद घेतली.

या प्रकरणी रविंद्र महादेव सोनवणे (वय 38, व्यवसाय शेती, रा. कुटेवस्ती, न्हावरे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंटेनर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार भोते हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

8 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

8 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

8 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

8 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago