शिरूर तालुका

शिक्रापुरात संत निरंकारी मंडळाकडून स्वच्छता मोहीम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील स्मशानभूमी, वेळ नदी व बाजार मैदानात संत निरंकारी मंडळ शिक्रापूर शाखेच्या वतीने सदगुरू सुदिक्षा माता व सतगुरू बाबा हरदेव सिंह महाराज यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करुन परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील संत निरंकारी मंडळ शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमचे उद्घाटन सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, संत निरंकारी मंडळाचे अध्यक्ष जयराम सावंत, भाऊसाहेब कापरे, सेवादलचे प्रदीप नावडे, चक्रधर भुजबळ, अरुण बेंडभर, श्याम थोरात, अरुण धुमाळ, चैतन्य गांजे यांसह आदी पदाधिकारी होते.

या मोहिमेबाबत बोलताना सदगुरू सुदिक्षा माता व सतगुरू बाबा हरदेव सिंह महाराज यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने भारत देशा मध्ये 27 राज्यातील 700 शहरामध्ये एका हजार पेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानांतर्गत संत निरंकारी मिशन स्वच्छ्ता अभियान राबवले गेले असल्याचे संत निरंकारी मंडळाचे अध्यक्ष जयराम सावंत यांनी सांगितले. दरम्यान सरपंच रमेश गडदे यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले तर भाऊसाहेब कापरे यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

12 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

12 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

12 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

12 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

12 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

12 तास ago