सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील रामलिंग, मलठण, कवठे येमाई, टाकळी हाजी या ठिकाणी श्री. संत सेना महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
मंगळवार (दि.२३) रोजी संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त रामलिंग रोडवरील शिक्षक काॅलनी येथील नाभिक समाजाचे संत सेना महाराज मंदिर परिसरात करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता. सकाळी अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज रासकर यांचे किर्तन व दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर, रामलिंगचे मा. सरपंच विठ्ठल घावटे, माजी आदर्श सरपंच नामदेवराव जाधव, उपसरपंच नितीन बो-हाडे, सदस्य सागर घावटे, तुषार दसगुडे, बाळासाहेब देंडगे, यशवंत कर्डिले, अमोल वर्पे, हिरामण जाधव, समता परिषदेचे किरण बनकर, माजी नगरसेवक विनोद भालेराव, निलेश गाडेकर, कुंभार समाजाचे तालुकाध्यक्ष योगेश जामदार, शिवसेनेचे शहरप्रमुख सुनिल जाधव,मयुर थोरात, मुकेश पाचर्णे, तुषार वेताळ, राष्ट्रवादीचे रविंद्र खांडरे, भाजपचे केशव लोखंडे, विजय नरके, रेश्मा शेख, रश्मी क्षिरसागर आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरुर शहर नाभिक संघटनेचे संस्थापक भाऊसाहेब क्षिरसागर, रणजीत गायकवाड, संतोष शिंदे, गोरख गायकवाड, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब गायकवाड, निलेश भोसले, संघटनेचे अध्यक्ष सनी थोरात, वैभव रायकर, प्रितेश फुलडाळे, संतोष गायकवाड, संतोष वाघमारे यांसह सर्व नाभिक बांधवांनी परिश्रम घेतले.
शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या दुःखद निधनानंतर निर्माण झालेली पोकळी कोण भरुन काढणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. दुःख बाजुला सारत त्यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे यांनी मंगळवार (दि.२३) रोजी रामलिंग रोड शिक्षक कॉलनी येथील मंदिरात श्री संत सेना महाराज यांचे दर्शन घेऊन कार्यकर्त्यांना वा-यावर सोडणार नाही अशी ग्वाही देऊन राजकारणात सक्रिय होत असल्याचे संकेत दिले.
पुतण्या जयसिंग सोळंकेंना देणार संधी! बीड: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटाच्या…
साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. साजूक तुपात ओमेगा-३,ओमेगा-९ हे फॅटी अॅसिड,अ, के…
1) सकाळी उठल्यावर गरम पाणी प्या हे पाचनासाठी चांगले असते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर…
प्रत्येक समाजाच्या सण-उत्सवात सहभागी होणे हीच महाराष्ट्राची परंपरा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे: छटपूजा हा केवळ धार्मिक…
मुंबई: आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी संघर्ष करणारे आणि देशाच्या…
अमित शाहांच्या उपस्थितीत १,५०० कोटींच्या पुनर्निर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन पुणे : तब्बल ११ वर्षांपासून बंद असलेल्या नॅशनल…