इतर

बैल धुण्यासाठी तलावाजवळ गेलेल्या काका पुतण्याला तिथेच मृत्यूने गाठले…

औरंगाबाद: महाराष्ट्रात दरवर्षी बैल पोळा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो.

आज बैलपोळा सणादिवशीच हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा बुडून मृत्यू झाला. कचरु काळे (वय 33) आणि रितेश अजिनाथ काळे (18) अशी मृत काका पुतण्याची नावे आहेत. पोळ्याच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बैलपोळा असल्याने काका पुतण्या बैल धुण्यासाठी शेतालगत असलेल्या पाझर तलावात गेले होते. बैल धुताना अचानक पंढरीनाथ यांना बैलाने झटका दिला. हा झटका अतिशय जोराचा असल्याने त्यांचा तोल गेला आणि ते तलावात पडले. काका तलावात पडल्याचे पाहून पुतण्या रितेशने त्यांना वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली असता रितेश आपल्या काकांना वाचण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. बैल धुण्यासाठी गेलेल्या या चुलत्या पुतण्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

11 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

20 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago