शिरूर तालुका

घोड धरण परिसरात बेकायदा वृक्षतोडप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या शाखा अभियंत्यावर गंभीर आरोप

प्रशासकीय यंत्रणेत खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा वृक्षतोड झाल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकारात पाटबंधारे विभागाचा शाखा अभियंता वैभव काळे हा अधिकारी थेट घटनास्थळी उपस्थित असून झाडे तोडण्याच्या कारवाईत सक्रीय सहभाग घेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे.

घटनास्थळी काळ्या रंगाची “महाराष्ट्र शासन” अशी पाटी लावलेली खाजगी कार उभी होती आणि त्या वाहनातूनच संबंधित अधिकारी आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत पोकलेनच्या सहाय्याने मोठमोठी झाडे जमीनदोस्त करण्यात आली.

या वृक्षतोडीसाठी वनविभाग, महसूल प्रशासनाची कोणतीही लेखी परवानगी घेण्यात आलेली नव्हती. तरीही अंदाजे १५ ते २० वर्षे वयाची लिंब, व इतर देशी झाडे बेकायदा तोडण्यात आली.

तोडलेली झाडे थेट एका खाजगी लाकूड विक्रेत्याला विकण्यात आली असून त्यातून आर्थिक लाभ मिळवण्यात आला आहे, अशी जोरदार चर्चा आहे.

जर ही बाब खरी ठरली, तर हा प्रकार केवळ पर्यावरणाची हानी करणारा नसून शासकीय अधिकाराचा गैरवापर करून आर्थिक भ्रष्टाचाराचा गंभीर गुन्हा ठरतो.

या प्रकरणी अद्याप पाटबंधारे विभाग, वनविभाग किंवा महसूल प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पवनसंरक्षण कायदा, पर्यावरण कायदा व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होणार का?

झाडे तोडणारा पोकलेन चालक व लाकूड विक्रेता यांच्यावरही कारवाई होणार का?

की हा प्रकारही फक्त चौकशीपुरता मर्यादित राहणार?घोड धरण परिसर हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग असून येथे पक्षी, वन्यजीव आणि जलस्रोतांवर या वृक्षतोडीचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी, शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

एका ग्रामस्थाने संतप्त शब्दांत सांगितले

“सामान्य नागरिकाने झाड तोडले तर गुन्हा दाखल होतो, पण अधिकारीच जर बेकायदा झाडे तोडून विकत असेल तर हा कायद्याचा मखलाच झाला नाही का?”या प्रकरणात फक्त चौकशी नव्हे तर तत्काळ निलंबन, फौजदारी गुन्हा दाखल करणे आणि आर्थिक लाभाची वसुली करणे ही किमान अपेक्षा आहे. अन्यथा यामुळे प्रशासनाची विश्वासार्हता धुळीस मिळेल, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

घोड धरण परिसरातील ही बेकायदा वृक्षतोड केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार, अधिकाराचा गैरवापर आणि कायद्याची पायमल्ली यांचे जिवंत उदाहरण ठरत आहे. आता प्रशासन धाडस दाखवते की मौन पाळते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

23 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

23 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

23 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

23 तास ago