शिरूर तालुका

शिक्रापुरात ग्रंथपाल दिनानिमित्त ग्रंथपाल संतोष काळेंचा सन्मान

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने काही वाचन प्रेमी युवकांकडून राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करत ग्रंथपाल संतोष काळे यांचे विशेष सन्मान करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे भैरवनाथ मोफत वाचनालयच्या माध्यमातून वाचक ग्रंथालयाभिमुख होण्यासाठी ग्रंथपाल संतोष काळे हे सतत नवनवीन प्रयोग व संकल्पना राबवीत असल्यामुळे शिक्रापूरसह परिसरामध्ये शिक्रापूर ग्रामपंचायतच्या ग्रंथालयास वाचकवर्ग विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने वाढलेला असल्याने राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने ग्रंथपाल संतोष काळे यांचे विशेष सन्मान करण्यात आला आहे.

यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी बबलूभाई शेख, तुषार आळंदीकर, माणिक चव्हाण, प्रथमेश विश्वास यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान ग्रंथपाल संतोष काळे यांना गुलाबपुष्प, पेन, पुस्तक देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना संतोष काळे हे अत्यंत शिस्तप्रिय, मनमिळावू ग्रंथपाल म्हणून कार्य करत असल्याच्या भावना सभासद तुषार आळंदीकर यांनी व्यक्त केल्या. यावेळी ग्रंथपाल संतोष काळे यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago