शिरूर तालुका

रांजणगाव गणपती येथे छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान…

रांजणगाव गणपती: शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे 15 मे शुक्रवार सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत मोरया मंगल कार्यालयात राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अभियानात रांजणगाव गणपती परिसरातील सर्व शेतकरी, खातेदार व नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या अडीअडचणी सोडवाव्यात असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व मंडळ अधिकारी स्वाती तावरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने जनतेसाठी लोकाभिमुख एकाच छताखाली अभियान चालू केले आहे. सदर अभियानात महसूल मंडळ स्तरावर शिबिर आयोजित करून या शिबिराचा शेतकरी व जनतेला त्यांच्या कार्यालयीन स्तरावर येणाऱ्या अनेक समस्या व अडचणी सोडविण्यासाठी कार्यालयीन कामाचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने सर्व विभाग एकाच दिवशी एकाच ठिकाणी उपस्थित राहणार असून जनतेला आपल्या समस्या सोडवण्यासाठी ते उपयुक्त होणार आहे.

शिरूर तालुक्यातल्या रांजणगाव गणपती मंडळातील रांजणगाव, गणेगाव खालसा, कासारी, खंडाळे, कोंढापुरी, बुरुंजवाडी, पिंपरी दुमाला, वाघाळे, करंजावणे व भांबर्डे या दहा गावातील शेतकऱ्यांची नागरिकांची कामे जसे की सातबारा दुरुस्ती, फेरफार, वारस नोंद, इकरार, बोजा, सात बारा मिळविणे, त्याचबरोबर नवीन रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, सामाजिक अर्थ सहाय्य योजना विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न, रहिवाशी, नॉन क्रिमिलियर, या सोबतच विविध विभाग या शिबिरात उपस्थित राहणार असल्याने त्यात पंचायत समिती, कृषी विभाग, पोलीस, भूमि अभिलेख, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे विभाग, वनविभाग, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, राज्य परिवहन महामंडळ, वीज वितरण कंपनी, आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, पोस्ट विभाग, इत्यादी विभागाचा या शिबिरात सहभाग राहणार आहे.

रांजणगाव गणपती मंडळातील जनतेच्या मोरया मंगल कार्यालयात 15 मे शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानात अडीअडचणी सोडण्यासाठी सोईचे होणार आहे. तरी रांजणगाव मंडळातील शेतकरी व नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व मंडळ अधिकारी स्वाती तावरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शिरुर; कारभारणीच्या ‘नथी’ तुन ‘कारभारी’ च मारतात तीर; पदाधिकारी महिलेच्या ‘पतीं’ चा वाढतोय हस्तक्षेप…?

शिरुर तालुक्यात हॉटेल समोरच तरुणावर हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात भरधाव कंटेनरने पिकअपला चिरडलं; दोन ऊसतोड मजुरांचा जागीच मृत्यू, १४ जखमी

शिरुर तालुक्यातील ‘एम डी’ ड्रग प्रकरणात मोठ्या ‘माशां’वर कारवाई कधी…?

Video! रांजणगाव MIDC दहशतीत! कामगारांवर हल्ले आणि लूटमारीचे वाढले प्रमाण…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

8 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

9 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

10 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

10 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

10 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

10 तास ago