रांजणगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरात परप्रांतीय कामगारांवर हल्ले, लूटमार आणि अमानुष मारहाणीच्या घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनत असून, “कामगार सुरक्षित तर उद्योग सुरक्षित” हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
View this post on Instagram
उदयपाल सिंह हा कामगार सोमवारी (ता. ४) रात्री घरी परतत असताना, औद्योगिक वसाहतीच्या बाहेरील परिसरात त्याच्या राहत्या खोलीपासून काही अंतरावर अज्ञातांनी अडवले. मोबाईल फोन व रोख रक्कम हिसकावून घेतल्यानंतर अमानुष मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात ते जखमी झाले असून, स्थानिकांच्या मदतीने प्रथम कारेगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी शिरूर येथील दवाखान्यात हलविण्यात आले.
या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीबाहेरील भागातही कामगार सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः घरी ये-जा करणाऱ्या कामगारांना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कामगार संघटना व स्थानिक नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, पोलिसांनी गस्त वाढवून अशा समाजकंटकांवर कडक कारवाई करावी, तसेच कामगारांच्या वास्तव्यास असलेल्या परिसरात सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी होत आहे. एकूणच, औद्योगिकीकरणाबरोबरच कामगारांच्या सुरक्षिततेकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक असून, अन्यथा वाढत्या उद्योगांसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
रांजणगाव एमआयडीसीमधील कंपनीत कामगाराचा मृत्यू…
रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणातून युवकाचा खून…
रांजणगाव एमआयडीसीत अंमली पदार्थांवर मोठा छापा; ६.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
शिरुर तालुक्यात लाखोंची फसवणुक; विश्वासू कर्मचाऱ्यानेच मालकाला घातला गंडा
शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…