शिरूर तालुका

प्रामाणिकतेचा उत्तम प्रत्यय! राजेंद्र टेमगिरे यांनी सापडलेले पाकीट पोलीसांच्या मदतीने मुळ मालकाच्या स्वाधीन

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): शिरूर ता. शिक्रापूर माणुसकी आणि प्रामाणिकतेचा उत्तम प्रत्यय शिक्रापूर येथे पाहायला मिळाला असुन. राजेंद्र टेमगिरे यांनी रस्त्यात सापडलेले महत्वाचे कागदपत्रांसह पाकीट कोणताही लोभ न ठेवता प्रामाणिकपणे मूळ मालकाकडे परत दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संतोष सिताराम जोगदनकर (रा. सोलापूर) हे रांजणगाव गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असताना त्यांच्या खिशातून पाकीट गहाळ झाले होते. या पाकिटात रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाची आरसी व इतर महत्वाची कागदपत्रे होती.

दरम्यान, शिक्रापूर येथील राजेंद्र टेमगिरे अहिल्यानगर-पुणे रस्त्यावरून मोटारसायकलने जात असताना राजेंद्र टेमगिरे यांना हे पाकीट सापडले असता. त्यांनी तात्काळ शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत हा प्रकार सांगितला. पाकिटामधील एका व्हिजिटिंग कार्डच्या आधारे त्यांनी संतोष जोगदनकर यांच्याशी संपर्क साधला व पोलीस स्टेशनमध्ये बोलावून संपूर्ण पाकीट त्यांच्याकडे सुपूर्त केले आहे. यावेळी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या पो. अमलदार रूपाली निंभोरे व पो. अंमलदार उमेश जायपत्रे हे उपस्थित होते. राजेंद्र टेमगिरे यांच्या या प्रामाणिकपणाचे शिरूर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या कृतीने समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांच्या डि बी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन म्हशी, दोन बैल आणि पिकअप वाहन असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिरुर पोलिसांच्या…

5 तास ago

शिरुर शहरात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका; २५७ केसेस, तब्बल ३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र…

5 तास ago

सावधान, ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, या आजारांचा धोका

पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…

13 तास ago

घसा सारखा खवखवतो, सतत घशात इन्फेक्शन? ५ उपाय, आजारी झोपून राहाव लागणार नाही

घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…

13 तास ago

हृदयविकार काही घरगुती उपाय

आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…

13 तास ago

‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

13 तास ago