शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात अवैधरीत्या गॅस रिफिलींगचा व्यवसाय जोरात सुरू…

गॅस वितरीत करणाऱ्या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची नागरीकांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बडया एच.पी गॅसच्या एजन्सीकडून गॅसचा काळाबाजार करून घरगुती गॅसचे कमर्शियल वापरासाठी रिफींलींग करून आर्थिक फायदयासाठी मोठया प्रमाणावर विक्री होत आहे. शिरूर शहरातील एजन्सीचे बेकायदेशीर गोडावून नदीच्या पलीकडे (गव्हाणवाडी, ता. पारनेर जि. अहमदनगर) येथे असल्याची व येथून बेकायेदशीरपणे काळया बाजारात गॅस टाक्या जात असल्याची चर्चा शिरूर तालुक्यात रंगली आहे.

पोलिसांच्या आर्थिक आशिर्वादामुळेच…
शिरूर तालुक्यात शिरुरसह, न्हावरे, कारेगाव, ढोक सांगवी, सोनेसांगवी, कोरेगाव भीमा, शिक्रापूर या भागात घरगुती गॅसचा वापर कमर्शियल टाक्यात रिफीलींगसाठी होत आहे. कंपनीत तसेच गाडी ड्रायव्हर काम करणाऱ्या कामगारांना ४ किलो टाकीत रिफीलींगचा राजरोसपणे काळाबाजार सुरू आहे. विशेष म्हणजे रांजणगाव पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर पुणे-नगर रोडलगत एका टपरीवर हा रिफिलींगचा व्यवसाय पोलिसांच्या आर्थिक आशिर्वादामुळे दिवसाढवळ्या राजरोसपणे चालू आहे. सदरचा एजन्सीधारक कॉम्पुटर सिस्टीमला प्रत्येक ग्राहकाला घरगुती गॅसचे वितरण दाखवून ह्या टाक्या काळया बाजारात विक्री करत असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे.

एका टाकी मागे ११५० रुपये फायदा…
मलठण येथे रिफीलींगसाठी गॅसच्या टाक्यांचा काळाबाजार केल्याने या एजन्सीधारकावर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. परंतु, पुरवठा विभाग व पोलिसांनी पुढील कारवाई अदयापपर्यंत केली नसल्याने तो अदयापही शिरुर तालुक्यात रिफीलींगसाठी गॅसच्या टाक्या पुरवत असल्याचे समोर आले आहे. ४ किलो गॅस रिफीलींगसाठी ४५० रुपये आकारले जात आहे. घरगुती गॅसच्या १६.२ किलो गॅसच्या टाकीतून ४ किलो गॅसच्या पाच टाक्या भरल्या जातात. म्हणजेच एकूण घरगुती गॅसच्या टाकीतून २२५० रुपये मिळतात. एका टाकी मागे ११५० रुपये फायदा रिफीलींगच्या माध्यमातून कमाविला जातो. रिफीलींग करताना हे लोक कुठलीही काळजी घेत नसून, नागरिकांच्या जीवाशी ते खेळत असून कधीही दुर्घटना घडून मोठी जीवीतहानी होऊ शकते. केवळ आर्थिक तडजोडीमुळे पुरवठा निरीक्षक आणि प्रशासनाचा कुठलाही अंकुश यांच्यावर राहीलेला नाही.

सिलेंडरचा स्फोट होण्याची दाट शक्यता…
विशेष म्हणजे गॅस कंपनीने ४ किलो गॅसच्या टाकीची निर्मिती केली नाही. या टाक्या बाहेरून नियमबाह्य पद्धतीने तयार करून याची विक्री केली जात आहे. जर चार किलो गॅसची टाकी असेल तर त्यात चार किलो गॅस भरता येत नाही. परंतु, ४ किलो गॅस रिफीलींग केल्याने सिलेंडरचा स्फोट होण्याची दाट शक्यता असते. या टाक्यांचा स्फोट झाल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. १६.२ किलो गॅसच्या टाकीत १४.२ किलो गॅस भरला जातो. त्यामुळे त्या सुरक्षित असतात.

unique international school

कारवाई करण्याची मागणी…
एकूणच शिरूर तालुक्यातील या बेकायदेशीर रिफिलींग करण्याऱ्यांवर व रिफिलींगसाठी टाक्या पुरवणाऱ्या एजन्सीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली असून, यांच्यावर कारवाई कधी होणार की आर्थिक तडजोडीने कारवाई बासणात गुंडाळणार? याकडे शिरूर तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

6 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago