राजकीय

बेट भागात नव्याने स्थापण झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरु…

शिरुर: शिरुर तालुक्यात टाकळी हाजी व जांबुत येथील ग्रामपंचायतचे विभाजन होवून नव्याने माळवाडी, म्हसे, शरदवाडी अशी नवीन स्वतंत्र गावे तयार झाली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या टाकळी हाजी, जांबूत सह नव्याने तयार झालेल्या या ३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.

टाकळी हाजी व जांबुत येथील पहिल्या कार्यकारी मंडळाचा कालावधी संपून जवळपास अडीच वर्षे या पंचायतींच्या कारभारासाठी प्रशासक नेमण्यात आले होते. या भागातील ग्रामपंचतीच्या निवडणुकीवर जिल्हा परिषद, पंचायत समितीची अनेक बेरजेची समीकरणे अवलंबून आहे. राष्ट्रवादीतील माजी आमदार पोपटराव गावडे विरुद्ध माजी सरपंच दामुशेठ घोडे यांच्या २ गटात सरपंच पदासाठी मोठा संघर्ष होऊन जोरदार लढत होणार आहे. या दोघांनी एकत्र येवून निर्णय घेतल्यास ही निवडणुक बिनविरोध होवू शकते.

unique international school

परंतू या दोघांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने अनेक दिवसापासून त्यांच्यात जमत नसल्याने एकमेकांविरोधात जोरदार टिकाटिप्पणी सुरु आहे. तसेच ते एकमेकांच्या कार्यक्रमातही हजर राहत नाही. माजी गृहमंत्री दिलीप वळसे यांनी (दि. ८) जुलै रोजी दोघांचीही टाकळी हाजी येथे पदाधिकाऱ्यां समवेत भेट घेतली असून त्यांची एकमेकांविषयीची गाऱ्हाणी ऐकली आहे. बंड थंड करण्यात वळसे पाटील यशस्वी होतात का? हे आता येणारा काळच ठरवणार आहे.

सामान्य नागरीकांकडून या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त होत असल्या तरी नव्याने गुढग्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या रणांगणात तयार असलेल्या राजकारणात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढल्याने असे काही घडेल असे वाटत नसल्याची व दोघांच्या भांडणात उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांकडून तीसरी आघाडी ही तयार होणार असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे.

माजी आमदार पोपटराव गावडे व माजी सरपंच दामुशेठ घोडे यांचे समर्थक एकमेकांना भिडण्याची तयारी करुन निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. तरुणाई राजकारणासाठी सज्ज झाल्याने बिनविरोध साठी समझोता होईल की जाणकार आणि नवोदित असे दोन गट तयार होतील हे चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. एकंदरीत परिस्थिती पाहता दोन्हीही गटाकडून पूर्वतयारी सुरू झाली असून ग्रामपंचायतच्या निकालावर पुढील जिल्हा परिषद, पंचायत समितीची राजनिती ठरणार असल्याने बडे नेते पुर्ण ताकतीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…

12 तास ago

रात्रीच्या जेवणानंतर इवलिशी वेलची चावून खा! एक नाही अनेक गुणकारी फायदे

रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी…

13 तास ago

SIR वादावर NDAमध्येही मतभेद? कुशवाहांचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू…

13 तास ago

कडा हादरले! गणेश विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू…

13 तास ago

मीटरवरील ‘हा’ लाल दिवा देतोय मोठा संकेत! वीजबिल वाढण्याआधीच कळू शकते कारण

मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…

13 तास ago

विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…

13 तास ago