शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी; तुझा कार्यक्रम करतोच…

शिरूर : सादलगाव (ता. शिरूर) येथील ज्येष्ठ पत्रकार संपत कारकुड यांना गावातील एकाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. श्री. कारकूड यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. रेवणनाथ प्रशांत माने उर्फ भैया (वय २०) असे आरोपीचे नाव आहे.

पत्रकार संपत कारकुड हे आपल्या शेताकडे जात असताना आरोपी माने याने रस्त्यात त्यांची गाडी अडवली. “तुझा बांध कुठे फोडला आहे रे, तू माझ्या चांगल्या डोक्यात बसलेला आहेस. तुझा एकदा कार्यक्रम करतोच,” अशी धमकी देत आरोपीने स्वतःच्या फोर व्हीलरच्या डिक्कीत लपवलेले हत्यार काढून मारण्यासाठी उगारले. मात्र, कारकुड यांच्या गाडीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने प्रसंगावधान राखत ते हत्यार वरचीवर धरल्याने पत्रकारांचा जीव वाचला.

पत्रकार कारकुड यांच्या शेतजमिनीचा बांध फोडण्यात आल्याचा प्रकार घडला होता. तो प्रकार पंचांना दाखवण्यासाठी ते शेताकडे जात असताना रस्त्यात दबा धरून बसलेल्या आरोपी माने याने अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून पत्रकार थोडक्यात बचावले आहेत. या प्रकरणी पत्रकार संपत कारकुड यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्याप्रमाणे कारवाई करा

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाकडून तीव्र निषेध

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणा-या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; हर्षवर्धन सपकाळ

पत्रकारांच्या एस.टी. प्रवास सवलतीत सुधारणा होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना २०हजार सन्मान निधी मिळणार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…

4 तास ago

रात्रीच्या जेवणानंतर इवलिशी वेलची चावून खा! एक नाही अनेक गुणकारी फायदे

रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी…

4 तास ago

SIR वादावर NDAमध्येही मतभेद? कुशवाहांचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू…

5 तास ago

कडा हादरले! गणेश विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू…

5 तास ago

मीटरवरील ‘हा’ लाल दिवा देतोय मोठा संकेत! वीजबिल वाढण्याआधीच कळू शकते कारण

मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…

5 तास ago

विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…

5 तास ago