शिरूर तालुका

आमदाबाद येथील नितीन थोरात यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर!

शिरूरः आमदाबाद येथील शेतकरी नितीन आर्जुन थोरात यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2021 करिता जाहीर झाला आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातून एका शेतकऱ्यास दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

नितीन आर्जुन थोरात यांनी त्यांच्या शेतामध्ये सघन केशरआंबा, भाजीपाला फळ पिके यामध्ये मेथी कोथिंबीर त्याचबरोबर वांगी टोमॅटो कांदा बटाटा हळद या पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळविले आहे. शेतीच्या मशागती करिता ट्रॅक्टर यंत्राचा वापर आणि आंतरमशागती करिता पावर विडर चा वापर केल्याने त्यांच्या वेळेत आणि खर्चात बचत झाल्याने उत्पन्नात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. या अनुषंगाने त्यांनी शेतामध्ये बांधावर चिंचेच्या झाडांची लागवड करून चिंचेपासूनही वार्षिक उत्पन्न सुरू असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बायोगॅस (गोबर गॅस) निर्मीती, शासकिय योजनेच्या अनुदानातून शेडनेटहाऊस आणि शेततळे उभारुन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पिकांना व फळबागेला ठिबकसंचाद्वारे पाणी दिले.

पशुपालन यामध्ये देशी गोवंशाची लालाकंधारी व गावरान जातीच्या गाय व म्हैस पालनामुळे दुध आणि शेणापासून गोबरगॕस निर्मीती व शेतीसाठी शेणखत उपलब्ध झाले आहे. याच बरोबर गांडूळखत निर्मीतीही केली. शेताच्या बांधावर चिंच लागवडी बरोबर उपयोगी असलेल्या व दुर्मीळ होत असलेल्या वड, पिंपळ, पायर (पिंप्री), बेल, खैर, मोह, बांबू, ऊंबर, कुचला, बहावा, आवळा, फणस, पळस, शमी, हिरडा, बेहडा, लक्ष्मीतरु, शेवगा, गुळवेल, अर्जुन, रिठा इत्यादी वृक्षांची लागवड केली आहे. त्याच बरोबर परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन नवनविन शेतीचे प्रयोग, कृषीविज्ञान केंद्राना भेटी देऊन मार्गदर्शन घेतात. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे परिसरात कौतुक होत असून, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नितीन थोरात यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान 

आमदाबादच्या उपसरपंचपदी प्रदिप साळवे बिनविरोध

शिरुर येथील डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि अत्याधुनिक उपचारामुळे असाध्य आजारावर रुग्णाने केली मात

Video; घोडगंगा कारखान्याच्या थकीत पगारासाठी कामगारांचे ‘शोले’ स्टाईल आंदोलन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 तास ago