शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या कवठे येमाई गावात आज (सोमवार) येथील ५८ वर्षीय व्यक्ती कोरोना जे एन वन या व्हेरियंटचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे, कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप शिरसाट, डॉ. पूर्णिमा दरेकर यांनी केले आहे.

डॉ. शिरसाट यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘सदर अठ्ठावन्न वर्षीय व्यक्तीस मागील तीन ते चार दिवसांपासून सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, कणकण थोडासा ताप येणे अशी लक्षणे जाणवत होती. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सदरील व्यक्तीवर औषोधोपचार करण्यात येत होते. परंतु तीन चार दिवस उलटून ही त्या व्यक्तीस बरे वाटत नसल्याने त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने व गावात कोरोनाचा यावर्षीचा हा पहिलाच रुग्ण निघाल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला.’ संबंधित रुग्णाला डॉ शिरसाठ व त्यांच्या सहकार्यांनी धीर देत औषोधोपचार केले असून गरज पडल्यास पुढील तपासण्या व उपचार करण्याचे आश्वासन डॉ. शिरसाट यांनी दिले आहे.

डॉ. दामोदर मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, शिरूर
‘सध्या शिरूर तालुक्यात कोरोनाचे जेमतेम चार रुग्ण जरी असले तरी सातत्याने बदलणाऱ्या वातावरणामुळे व त्यातच थंडीचे ही दिवस असल्याने सर्दी, खोकला, थंडीताप असे रुग्ण उपचारासाठी येत आहेत. कोरोना वरील बहुतांशी तपासण्या व औषधे स्थानिक आरोग्य केंद्रात विनामूल्यं उपलब्ध आहेत. असे असले तरी नागरिकांनी ही दक्षता घेताना गर्दीची ठिकाणे टाळावीत, सर्दी, खोकला, थंडीताप जाणवल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात औषोधोपचार घ्यावेत.

डॉ. संदीप शिरसाट, वैद्यकीय अधिकारी, कवठे येमाई.
‘कवठे गावात प्राथमिक तपासणीत कोरोना जे एन वन या व्हेरियंटचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असला तरी त्यावरील योग्य तो औषध साठा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. नागरिकांनी दक्षता घेताना, वारंवार हात स्वच्छ साबणाने धुवावेत, सॅनिटाझरचा व मास्कचा वापर करावा. गरज पडल्यास अशा सर्दी, खोकला, थंडीताप, डोकेदुखी जाणवणाऱ्या रुगणांनी तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.’

शिरूर तहसिल कार्यालयात चक्क रात्रीस खेळ चाले…

शिरुर तहसिल कार्यालयात नागरीकांची होतेय आर्थिक लूट

पुणे-अहमदनगर महामार्गावरील दिशादर्शक फलकाचा जाहिरातीसाठी सर्रास वापर…

शिरुर तालुक्यातील “त्या” लग्नपत्रिकेची होतेय पुणे जिल्हयात चर्चा, प्रत्येक गावासाठी वेगवेगळी पत्रिका

शिरूर तालुका टीम

Recent Posts

टाकळी हाजी पोलीस हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट?; नागरिकांकडून कारवाईची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे…

3 तास ago

शिरूर तालुक्यात डीपी चोरीच्या घटना; संयुक्त पथकाने गस्तीला सुरुवात…

शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त…

4 तास ago

शिरूर तालुक्यात प्रियकराने केली चिमुकल्याची हत्या; लिव्ह इन मुळे लाईफ धोक्यात…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, एका तीन…

4 तास ago

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

9 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

9 तास ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

9 तास ago