shelke-family
शिक्रापूरः शिरूर तालुक्यातील पिंपळे (खालसा) येथील एका संवेदनशील शेतकरी दांपत्याने निसर्गप्रेमाचे आणि माणुसकीचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. शेतीसाठी कठीण परिस्थिती, वाढता खर्च आणि अनिश्चित हवामान अशा अडचणी असतानाही एका दांपत्याने आपल्या दोन एकर क्षेत्रावरील ज्वारीचे पिक पाखरांच्या चाऱ्यासाठी खुले ठेवले आहे. विशेष म्हणजे या शेतावर कोणतीही राखण न ठेवता ज्वारी पक्ष्यांना मुक्तपणे खाण्यासाठी सोडून देण्यात आले आहे.
पिंपळे (खालसा) येथील बाळासाहेब शेळके आणि दिपाली शेळके हे मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारे दांपत्य म्हणून ओळखले जाते. सामाजिक, राजकीय, शैक्षणीक क्षेत्रात काम करत असताना त्यांचे प्राणीप्रेम अनेकांना माहित आहे. यंदा त्यांनी तब्बल दोन एकर ज्वारीच्या पिकाचे राखण न करता पक्षांना चारा म्हणून सोडून दिले आहे. त्यांच्या या निर्णयाचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
शेळके दांपत्याच्या शेतावर सकाळ-संध्याकाळ चिमण्या, कावळे, कबुतरे, साळुंकी, तितर तसेच इतर अनेक पक्ष्यांचे थवे ज्वारीवर ताव मारताना दिसत आहेत. पक्षी मुक्तविहार संचार करताना आणि चारा खातानाचे पाहून आनंद होत आहे. निसर्गाने आपल्याला खूप काही दिले आहे. आपणही निसर्गासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी भावना व्यक्त करताना ज्वारीच्या पिकाचे राखण न करण्याचा निर्णय घेतल्याचे बाळासाहेब शेळके आणि दिपाली शेळके यांनी सांगितले. आर्थिक नुकसान होईल याची जाणीव असूनही, पक्ष्यांचे जगणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्येही कौतुकाची भावना निर्माण झाली आहे. अनेकांनी हा निर्णय पर्यावरणपूरक आणि प्रेरणादायी असल्याचे सांगत, इतर शेतकऱ्यांनीही शक्य त्या प्रमाणात पाखरांसाठी पिकाचा काही भाग राखून ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
शिरूर तालुक्यातील शेळके दांपत्य हे केवळ शेती करणारे नाही, तर निसर्गसंवर्धनाचा संदेश देणारा एक आदर्श ठरत आहे. दोन एकर ज्वारीतून त्यांनी पाखरांना अन्न दिलेच, पण समाजालाही माणुसकी, संवेदनशीलता आणि पर्यावरणाची जबाबदारी यांचे महत्त्व शिकवले आहे. माणुसकीचा मळा फुलवणारा शेतकरी म्हणून बाळासाहेब शेळके आणि दिपाली शेळके यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
टाकळी हाजी येथे बैलाचा दशक्रिया विधी संपन्न…
शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका; शेतकरी मेल्याचे सरकारला सोयर सुतक नाही
Video; शिरुर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात; भाजीपाल्याच्या घसरलेल्या दरांचा मोठा फटका
शेतकरीपुत्राने तयार केल ऊसभरणी यंत्र; अवघ्या ४५ मिनिटांत उसाचा एक ट्रेलर भरणार
शिरुरमधील रुबी हॉल संलग्न हॉस्पिटलवर गंभीर आरोप आयुष्यमान कार्ड असुनही गोरगरीबांची आर्थिक लुट…?
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…