महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी राहणार बंद…

पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामासह सर्व कामे सुरक्षित, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मंदिर तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 9 जानेवारी 2026 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये मात्र आठवडाभर मंदिर भाविकांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार आणि भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत 23 डिसेंबर रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. भिमाशंकर मंदिर 9 जानेवारीपासून पुढील तीन महिन्यांसाठी भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026 हा महाशिवरात्रीचा कालावधी वगळता मंदिर दर्शनासाठी बंद राहील. महाशिवरात्री दरम्यान मात्र भाविकांसाठी मंदिर खुले राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.

सन 2027 मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, त्याआधी लाखो भाविक भीमाशंकरला दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे प्रशासनासाठी अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकराची नित्य पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी परंपरेनुसार नियमितपणे सुरू राहणार आहेत. मात्र या कालावधीत भाविकांना थेट दर्शन किंवा मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी आणि भीमाशंकर ग्रामस्थ वगळता अन्य कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास हा दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांनी संयम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

श्रीक्षेत्र भीमाशंकरसह 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू…

Video: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी…

Live Video:स्टेजवर हनुमानाची भूमिका करताना प्रभू श्रीरामांच्या चरणी सोडला प्राण…

खंडाळे तीर्थक्षेत्रात संतश्रेष्ठ निळोबाराय गाथा मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न!

भगवान शंकराच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा का घालत नाहीत…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

14 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago