शिरूर तालुका

शिरूर! ग्राहक सेवा केंद्राकडील एच.पी. गॅस पुरवठा ठप्प…

मांडवगण फराटा (संपत कारकूड): शिरूर तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्राद्वारे चालवण्यात येणाऱ्या दुकानांचा गॅस पुरवठा बंद केल्यामुळे तालुक्यातील पूर्व भागातील दोन गावांमधील दोन सेवा केंद्राचा एचपी गॅस पुरवठा ठप्प झाला आहे. येथील गॅस ग्राहकांना पाच ते सात किलोमीटर जाऊन गॅस आणण्याची वेळ आली आहे.

ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी तालुक्यातील अनेक गावांमध्ये केंद्र सरकारकडून सीएससी धारकांना ‘ग्राहक सेवा केंद्र’ चालवण्याची संधी देऊन तालुका भर एचपी गॅस पुरवठा केंद्राचे जाळे तयार करून ग्राहकांची गैरसोय टाळण्याचा यशस्वी प्रयत्न झाला होता. अत्यंत चांगल्या पद्धतीने हे जाळे निर्माण होऊन सर्वसामान्यांना घरपोच गॅस मिळत होता. परंतु, सेवा केंद्राचे करार संपुष्टात आल्याचे सांगून केंद्राकडील शासनाच्या नियमाप्रमाणे देण्यात आलेल्या सात टाक्या एस.डी. दुगड यांच्याकडून उचलण्यात आल्यामुळे केंद्रांची सेवा थांबलेली आहे. रिकाम्या टाक्या नसल्यामुळे पुढे ग्राहकांना भरलेल्या टाक्या कशा देणार? असा प्रश्न विविध केंद्रधारक यांनी केला आहे

सेवा केंद्र मोडीत काढण्याचा डाव…
शिरूर तालुका भर कार्यरत असलेल्या सेवा केंद्रांकडील रिकाम्या टाक्या गोळा करून जास्त नफा देणाऱ्या खाजगी एजंटच्या घशात घालून सीएससी सेवा केंद्र मोडीत काढण्याचा डाव केला जात आहे. हा डाव वेळीच मोडीत काढला नाही तर, सी.एस.सी. केंद्र संपुष्टात येतील अशी भीती विविध केंद्र धारकाकडून व्यक्त केली जात आहे

प्रशासनाचे दुर्लक्ष…
गेली पाच वर्षापासून विकसित केलेल्या आणि गावातील 100% केवायसी पूर्ण करून मेहनत घेतलेल्या सीएससी धारकांना डीलरकडून कोणतीही पूर्वसूचना अथवा माहिती न देता शिरूरचे डीलर एस डी दुगड यांनी रिकाम्या टाक्या गोळा करून कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली दिसून येत नाही. शिरूरचे पुरवठा अधिकारी श्री. वनमाने यांच्याकडे दोन लेखी विनंती अर्ज दिले असता डीलरला पत्र काढतो, अशा शब्दाची बळवण करून हा विषय गांभीर्याने घेतल्या नसल्याचे दिसून येत आहे.

गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसेसह एकजण अटकेत; शिरूर पोलीसांची धडक कारवाई

शिरूर तालुक्यातील विवाहित महिलेची वटपौर्णिमेच्या दिवशी आत्महत्या…

शिरूर तहसिल कार्यालयात महसूल लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरूर शहरासह तालुक्यात कामगार साहित्य वाटपाच्या नावाखाली दलालीचा अड्डा

गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसेसह एकजण अटकेत; शिरूर पोलीसांची धडक कारवाई

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

10 तास ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

2 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

2 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

2 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

2 दिवस ago