शिरूर तालुका

शिरूर! नरेश्वर वस्ती येथे शिक्षणाचा ‘गव्हाणे पॅटर्न’ राबवत घडवणार विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य…

कोरेगाव भीमा : “ग्रामीण भागातील प्रत्येक मुला-मुलीला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, आणि हे हक्क त्यांना मिळवून देणे हे आपले सामाजिक कर्तव्य!” या विधायक दृष्टिकोनातून प्रेरित होत, कोरेगाव भीमाचे माजी सरपंच अमोल शहाजी गव्हाणे यांनी बॅग (दप्तर) व ग्राम पंचायत सदस्या जयश्री गव्हाणे यांनी वह्या वाटप करत एक आदर्शवत शैक्षणिक मदतीचे काम करत आपल्या सामाजिक बांधिलकी जपत, नरेश्वर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग आणि वह्या वाटप केले. शासनाची पुस्तके व गणवेश वाटपही करण्यात आले. हा केवळ बॅग, वह्या पुस्तकांचे वाटप नव्हे, तर ग्रामीण भागाच्या उज्वल भविष्यासाठी टाकलेले कृतीयुक्त आदर्श पाऊल आहे.

ज्ञानदानाचे विधायक उद्दिष्ट: या उपक्रमामागे केवळ वस्तू वाटप करणे हे उद्दिष्ट नव्हते, तर त्यामागे एक व्यापक दृष्टी होती. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे, त्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील पालकांमध्ये शिक्षणाप्रती अधिक जागृती निर्माण करणे हेच या विधायक उपक्रमाचे मुख्य ध्येय होते. माजी सरपंच अमोल गव्हाणे यांच्या या दूरदृष्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रेरणादायी वाटप सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दिपक गुलाबराव ढेरंगे, उपाध्यक्ष पल्लवी प्रमोद गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विकी भीमराव गव्हाणे, शिक्षक लहू चव्हाण, शिक्षिका काटे मॅडम,शिक्षण तज्ञ सुनील गव्हाणे, जमीर शेख,भरत दरेकर,स्वाति भानुदास शिवले, शितल मगर, कुमार साखरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीने या उपक्रमाला अधिक बळ मिळाले आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले.

ग्रामीन शिक्षणाला नवी ऊर्जा, नवी उमेद! माजी सरपंच अमोल गव्हाणे व ग्राम पंचायत सदस्या जयश्री गव्हाणे यांच्या या विधायक पावलामुळे नरेश्वर वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेबद्दल समाजात एक अत्यंत सकारात्मक संदेश गेला आहे. ग्रामीण भागातील पालकांमध्ये शाळेच्या गुणवत्तेबाबत आणि भविष्याबाबतचा विश्वास अधिक बळकट झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे एक नवी ऊर्जा मिळाली आहे; त्यांना शालेय जीवनात पुढे जाण्यासाठी नवी उमेद मिळाली आहे.

संबंधित उपक्रम केवळ शालेय वस्तूंच्या वाटपापुरता मर्यादित नसून, तो ग्रामीण भागातील शिक्षणाला प्रेरणा देणारे, विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे आणि समाजात शैक्षणिक बदल घडवणारे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. ही तर केवळ सुरुवात आहे हा फक्त एक उपक्रम नाही, तर शिक्षण क्षेत्रात सातत्याने सकारात्मक बदल घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. येत्या काळातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहून विज्ञान, कला, खेळ, संगणक प्रशिक्षण अशा विविध आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची मालिका राबविण्याचा दृढ संकल्प आहे.”
– माजी सरपंच अमोल शहाजी गव्हाणे

केंदूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगल साकोरे यांची बिनविरोध निवड

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी ग्रामस्थांना घडवली विमानाने काशी यात्रा अन् गंगापूजन सोहळा…

शिरुर; चार वर्षात ‘सरपंच’ फक्त ‘नामधारी’ ग्रामपंचायतच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्या ‘महाशयां’ चीचं लुडबुड…?

शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; कहीं खुशी, कहीं गम’

शिरूर तालुक्यात शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सरपंच यांना सुपारी देवून जीवे मारण्याची धमकी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

11 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

11 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

11 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago