शिरूर तालुका

शिरुरमध्ये महिला पोलिस अधिकार्‍याच्या वर्तनावर संताप; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील बिबट हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याबाबत न्याय व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी निलेश वाळुंज यांनी सोमवारी (ता. ३) कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयासमोर शांततामय आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान बहुतेक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी संयम राखत शांततेत नागरिकांशी संवाद साधला. मात्र, एका महिला पोलिस अधिकार्‍याच्या चिघळवणाऱ्या वर्तनामुळे परिस्थिती क्षणिक तणावपूर्ण बनली होती.

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिला अधिकारी यांनी नागरिकांशी उग्र व रागीट भाषेत बोलत अनावश्यक संताप व्यक्त केला. आंदोलन शांततेत सुरू असताना अशा प्रकारचे वर्तन हे “जाणीवपूर्वक वातावरण तापवण्याचा प्रयत्न होता काय?” असा सवाल आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ अस्वस्थता निर्माण झाली होती. दुसरीकडे, पोलिस उप.निरीक्षक राहुल भागवत, गोविंद खटिंग तसेच हवालदार विनोद काळे, सचिन गोरे व शेलार यांनी दाखवलेला संयम व शिस्तीचे नागरिकांनी विशेष कौतुक केले आहे. या अधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेबाबत वरिष्ठांकडे अभिप्रायही कळविण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

या प्रकरणी संबंधित महिला पोलिस अधिकारीविरोधात मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृह सचिव, मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष, पोलिस महासंचालक, विभागीय आयुक्त, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक आणि शिरूरपोलिस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्यालयाने ही तक्रार गृह विभागाकडे पाठवली असून, पोलिस महासंचालकांनीही पुढील कार्यवाहीसाठी पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांना निर्देश दिल्याचे समजते.

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी सांगितले, ‘ही लढाई केवळ एखाद्या व्यक्तीविरुद्ध नाही, तर लोकशाही मूल्यांचा आणि शांततापूर्ण आंदोलनाच्या घटनात्मक अधिकाराच्या संरक्षणाची आहे. नागरिकांशी असभ्य वर्तन करणाऱ्या बेजबाबदार लोकसेवकांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय समाधान होणार नाही.’ दरम्यान, या प्रकरणी काय निपक्षपाती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुक्यात महिलेस शिवीगाळ करून मारहाण; गुन्हा दाखल…

शिरूर! हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत पोलिसांचेही डोळे पाणावले…

शिरूर मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी…

शिरूरमध्ये मित्राचाच मित्रावर प्राणघातक हल्ला; जुन्या वादातून २१ वर्षीय तरुणाचा केला खुण

गंगापेट्रोल पंपाजवळ तिघांकडून व्यापाऱ्यावर हल्ला, शिरूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

2 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

3 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

7 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

7 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

7 तास ago