शिरूर तालुका

विडिओ: पिंपरखेड मध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस….

सविंदणे (अरुणकुमार मोटे): दिवसभर उन्हाचा मोठा तडाखा, प्रचंड उकाड्यामुळे पिंपरखेड व परिसर त्रस्त होता… संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. व परिसर जलमय झाला. ग्रामस्थ ही निवांत झाले… परंतु रात्री साडेतीन च्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मात्र हा पाऊस वेगळेच चिन्ह दाखवत होता…. थांबतही नव्हता उलट जोर वाढत गेला….. सकाळी साडेपाच च्या सुमारास पावसाने उसंत घेतली…. मागच्या पन्नास वर्षात असा पाऊस पाहीला नव्हता असे जेष्ठ नागरिक सांगत होते…. प्रत्येक ओढा पातळी सोडुन वाहत होता. शेतातील पाणी बांध फोडून उसळी घेत होते…. जमीन सपाटीकरण करताना गाडले गेलेले ओढे पुन्हा आपली सिमा दाखवत होते…. पिंपरखेडमधील शेतीची मोठी हानी करत पाणी नदीच्या दिशेने धावत होते. सुरुवातीला उत्सुकतेचे रुपांतर नंतर काळजी व चिंतेत बदलत गेले….

पिंपरखेड ची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की शेजारच्या कोणत्याच गावातील पाणी या गावात येत नाही त्यामुळे नदीला आला तोच पुर…. ओढ्यांनी कधीच पुरस्थिती अनुभवलेली नव्हती… दाभाडेमळा, भागडीरोड, पारगाव रोड, मधलामळा, आंबेवाडी येथील शेतांचे बांध फुटले…. दाभाडेमळा, पारगाव रोड, आंबेवाडी येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, प्रभाकर ढोमे यांची कांद्याची बराखी पाण्यात जाऊन मोठे नुकसान झाले.

पारगावरोड येथून आंबेवाडीकडे जाणारा ओढा पाणी पारगाव रोड कडे वळवुन दिल्याने अरुंद झाला होता. मात्र, निसर्गाने एकाच सपाट्यात तो ओढा पुन्हा पुर्वव्रत केला…. मात्र या ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले… आंबेवाडी येथुन जाणा-या सरांडीच्या ओढ्याने देखील पातळी ओलांडत मोठे नुकसान केले… अनेक शेताच्या बांधांबरोबरच शेतक-यांनी ओढ्यांवर नळ्या टाकुन पलीकडे जाण्यासाठी जे रस्ते केले होते ते सगळे तुटले आहेत… मुरुम सहज उपलब्ध होत नसल्याने आता त्या शेतक-यांना मोठा खर्च होणार आहे….. मा. सरपंच रामदासशेठ ढोमे यांचे पीव्हीसी पाईपही वाहुन गेले…

निसर्गाने निर्माण केलेली पाणी वितरण व्यवस्था बदलणे हे अत्यंत धोक्याचे आहे… ओढ्यांमध्ये झाडी निर्माण झालेली आहे तसेच मोठी लाकडे व झुडुपे यामुळे पाणी शेतात मोठ्या प्रमाणात घुसल्याचे पाहायला मिळते… त्यामुळे शेतक-यांनी शेताबरोबरच ओढ्यांच्या स्वच्छतेकडेही ग्रामपंचायत व महसुल प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे…. झालेली नुकसानभरपाई मिळणे अत्यंत गरजेचे असुन प्रशासकीय पातळीवर लवकरात लवकर पंचनामे होऊन अहवाल पाठवुन मदत मिळण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेश जामदार, पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

16 तास ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

1 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

1 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

4 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

6 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

6 दिवस ago