शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मराठमोळा युवक रोहित जासूद याने अभिनयाच्या क्षेत्रात थेट आंतरराष्ट्रीय झेप घेतली आहे. त्याचा पहिलाच चित्रपट जगातील नामांकित स्वतंत्र चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या ‘चेलसी फिल्म फेस्टिवल’ (Chelsea Film Festival) साठी नामांकित झाला असून हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला न्यू यॉर्कमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात रोहितने प्रमुख भूमिका साकारली असून त्याच्या नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनयाची दखल समीक्षक व आंतरराष्ट्रीय प्रेक्षक घेत आहेत. मेहनत व चिकाटीच्या बळावर त्याने चित्रपटाला नवा चेहरा दिला आहे. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या या मोठ्या यशामुळे रोहितच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या चित्रपटानंतर रोहितने न्यू यॉर्कमध्ये आणखी एका चित्रपटात प्रमुख भूमिका निभावत दिग्दर्शनाची धुरा स्वतः हाती घेतली आहे. या चित्रपटाचे पोस्ट-प्रोडक्शन काम अंतिम टप्प्यात असून लवकरच तो विविध आंतरराष्ट्रीय फेस्टिवल्समध्ये झळकणार आहे.
कोरोना काळात मुंबईत बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असताना रोहितला अभिनयाची तीव्र ओढ जाणवली. धाडस करून त्याने पालकांसमोर आपले स्वप्न मांडले – “मला न्यू यॉर्कला जाऊन अभिनय शिकायचा आहे!” – आणि आई-वडिलांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला. त्या प्रेरणेनेच तो न्यू यॉर्कला गेला आणि तेथून त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली.
“मी कलाकार म्हणून अजून कसून काम करणार आहे. एक दिवस मराठी मुलगा जगाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेला पाहायचा आहे,” अशी ठाम भावना रोहित व्यक्त करतो. त्याला कायम प्रोत्साहन व मार्गदर्शन देणारे वडील उद्योजक बाबासाहेब जासूद व आई ॲड. हेमा जासूद यांच्या पाठबळामुळे त्याने आपले स्वप्न सत्यात उतरवले.रोहितच्या या यशामुळे शिरूर परिसरात आनंदाचे वातावरण असून, पहिल्याच चित्रपटात आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमुख भूमिका साकारून नावाजला जाणारा रोहित हा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…