शिरूर तालुका

धक्कादायक; बेल्हा-जेजुरी महामार्गावरील एस टी चालक-वाहकास दमदाटी करत मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे) जांबुत (ता.शिरुर) गावच्या हद्दीतील बेल्हा-जेजुरी महामार्गावरील पंचतळे येथे गुरुवारी (दि २९) शिरुर-नारायणगाव एस टी बस च्या चालक व वाहकास मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत एसटी बस चालक कुंडलीक ज्ञानदेव गाडीलकर यांनी राहुल सोनवणे (रा.जांबुत) याच्या विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

 जांबुत गावच्या हद्दीतील पंचतळे येथील चौकात एस टी बस थांब्यावर बस थांबवली असता एस टी बस (एम एच १४ बी टी ४२७९) मधुन प्रवासी उतरत असताना राहुल सोनवणे (पुर्ण नाव समजले नाही) याने त्याचा डंपर बसच्या समोर उभा केला. बस चालक गाडीलकर यांनी डंपर चालक राहुल सोनवणे यास डंपर बाजुला घेण्यास सांगितले असता सोनवणे याने गाडीलकर यांना शिवीगाळ करत मारहाण करुन ढकलुन दिले. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे गाडीलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

 

ग्रामीण भागात गोरगरिबांच्या सेवेसाठी अविरत सेवा देणारे एसटी महामंडळाचे चालक, वाहक यांना नित्याने ठरलेल्या मार्गावरुन प्रवास करावा लागतो. मात्र अशा मारहाणीच्या घटना घडल्याने त्यांचे मनोबल खचणार असुन दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या व शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

 

बस चालकास मारहाण सुरु झाल्यानंतर मी मोबाईल मध्ये या घटनेची शूटिंग सुरू केली. मात्र शूटिंग चालू असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथे उपस्थित असलेला स्वामी शिंदे या युवकाने माझ्याकडून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी राहुल सोनवणे याने मलाही मारहाण केली असे एस टी बसचे वाहक शांताराम मारुती रासकर यांनी सांगितले.

 

माझ्या पायाचे ऑपरेशन झाले आहे.पायामध्ये रॉड टाकलेले असलेने मला मारहाण झाली तेव्हा मी जमिनीवर कोसळलो. मारहाण करणारा इसम हा तेथील स्थानिक असलेने उपस्थितांपैकी कुणीही मला मदत केली नाही. बस पोलीस ठाण्यात घेवून यावी लागली. यामुळे दररोज बस ने जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची गैरसोय झाली.

कुंडलिक गाडीलकर

(एस टी बस चालक)

 

दुर्दैवी; शिरुर तालुक्यातील निमोणे गावात साप चावल्याने दोन वर्षाच्या मुलीचा उपचारापुर्वी मृत्यू

रामलिंग महिला उन्नती व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांनी आमदार पवार यांचा वाढदिवस साजरा

संतापजनक ; सात म्हशींची एकाच गाडीतुन कृरपणे वागणुक देऊन वाहतूक केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

22 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

22 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

22 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

22 तास ago