रामलिंग महिला उन्नती व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांनी आमदार पवार यांचा वाढदिवस साजरा

शिरुर (तेजस फडके) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्य हे नेहमी समाजाचा हिताचे असते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व महिला भगिनींनी माझ्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले. त्या सर्वांचे मी खुप आभार मानतो. तसेच शाळेतील मुलांनी चांगला अभ्यास करुन स्वतःचे भवितव्य घडवले पाहिजे असे प्रतिपादन शिरुर-हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांनी केले.

शिरुर येथील जुन्या नगरपालिकेच्या कार्यालयात आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य निबंध, वकृत्व तसेच रांगोळी स्पर्धा यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे गुरवार (दि २९) रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला भगिनींनी तुतारी हलगीच्या या पारंपरिक वाद्याच्या गजरात आमदार अशोक पवार यांचे स्वागत केले. तसेच प्रवेशदारावर औक्षण करत पुणेरी पगडी घालुन त्यांचा सत्कार केला.

 

 

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दिपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी यावेळी राणी बनकर यांनी आमदार पवार यांची प्रतिमा सुंदर रांगोळीत साकारली होती. याचे आमदार पवार यांनी कौतुक केले. विशेष म्हणजे आमदार पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महिला भगिनींनी लाल दिवा असलेल्या ॲम्बेसिडर गाडीच्या आकाराचा केक बनवुन आणला होता. अशोक पवार यांच्या हस्ते मंत्री पदाच्या गाडीचा केक कापुन त्यांना भावी मंत्रीपदासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

यावेळी निबंध, वक्तृत्व, तसेच रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या शिरुर तालुक्यातील १२० माजी सैनिकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पत्रकारांचाही विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी तर सुत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी आणि आभार गिता आढाव यांनी मानले.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, युवक तालुकाध्यक्ष तुषार दसगुडे, जिल्हा उपाध्यक्ष शामकांत वर्पे, युवक जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गोरे, युवकचे तालुका उपाध्यक्ष केशव शिंदे, नगरसेवक रविंद्र ढोबळे, सरपंच गोविंद कुरुंदळे, शिरुर ग्रुप सोसायटीचे संचालक शरद पवार, चेअरमन अप्पा वर्पे, महिला दक्षता समितीच्या शोभना पाचंगे, साधना पतसंस्थेच्या अध्यक्षा साधना शितोळे, राष्ट्रवादीच्या युवती तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे, शिरुर शहर अध्यक्षा डॉ स्मिता कवाद, डॉ सेल अध्यक्षा डॉ स्मिता बोरा, अश्विनी जाधव तसेच सर्व आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

दुर्दैवी; शिरुर तालुक्यातील निमोणे गावात साप चावल्याने दोन वर्षाच्या मुलीचा उपचारापुर्वी मृत्यू

भिक्षा नको, सुरक्षा दया; रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने बदलापुर घटनेच्या निषेधार्थ तहसीलदार म्हस्के यांना निवेदन

शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाटजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला दहा गुन्ह्यांचा आरोपी! पुण्यातून अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ४ लाख २५…

13 तास ago

शिरूर पोलिसांची दिपावलीच्या पार्श्वभुमीवर सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त…

शिरूर (तेजस फडके) : आगामी दिपावळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरुर शहरातील नागरिक, व्यापारी आणि सराफ व्यावसायिकांच्या…

13 तास ago

खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाचे आकांडतांडव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवू! सक्तीच्या कर्जवसुलीवर एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…

1 दिवस ago

दुष्काळ निवारणासाठी ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन; शेतकऱ्यांची सक्तीची कर्जवसुली खपवून घेणार नाही!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाला इशारा; नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीचाही घेतला आढावा नाशिक : राज्यातील दुष्काळी…

1 दिवस ago

‘स्थगितीवाले नाही, तर प्रगतीवाले आहोत!’; सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा कायापालट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गंगापूर रस्त्याचे भूमिपूजन; अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन वसतिगृहाचे उद्घाटन नाशिक: पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रातील विकासकामांच्या माध्यमातून…

1 दिवस ago