शिरूर तालुका

लोकसेवा आयोगातून आमदाबादच्या श्रद्धा जाधव यांची कृषी अधिकारीपदी निवड

शिरूर (नितीन थोरात): शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील श्रद्धा चंद्रकला राजेंद्र जाधव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत कृषी अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे आमदाबादसह टाकळीहाजी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

श्रद्धा या शेतकरी राजेंद्र गणपत जाधव यांच्या द्वितीय कन्या आहेत. लहान वयातच पितृछत्र हरपल्यानंतर जाधव कुटुंबावर कठीण प्रसंग ओढावले होते. अत्यंत खडतर परिस्थितीत शेतीच्या उत्पन्नावर काबाडकष्ट करत राजेंद्र जाधव यांनी आपल्या तीनही मुलींना उच्च शिक्षण दिले. त्यापैकी श्रद्धा यांनी बी.एस्सी. अॅग्री शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करत कृषी अधिकारी पद पटकावले.

काही वर्षांपूर्वी श्रद्धा यांचा विवाह तालुक्यातील बेट भागातील नेते सावित्राभाऊ थोरात यांचे चिरंजीव अक्षय थोरात यांच्याशी झाला आहे. शिक्षण, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे जाधव कुटुंबासह संपूर्ण परिसराचा त्यांच्यावर अभिमान व्यक्त केला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

8 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

12 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

12 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

12 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

12 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

13 तास ago