महाराष्ट्र

एसटीच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ बसची भर

मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) बस बांधणीत नवे प्रयोग करत आपल्या ताफ्यात आधुनिक बस दाखल करण्यास सुरुवात केली असून त्याचा थेट फायदा महामंडळासह प्रवाशांनाही होऊ लागला आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी एसटीच्या ताफ्यात असलेली ५५ आसनी बस आता नव्या अत्याधुनिक स्वरूपात पुन्हा एकदा सेवेत येत आहे.

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने ३ बाय २ आसन व्यवस्था असलेल्या अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या बस राज्यातील सर्व विभागात टप्प्याटप्प्याने दाखल होणार असून जळगाव विभागासाठी २५० बसांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

एसटीच्या ताफ्यात मोठी भर पडत असून, या ५५ आसनी बसमुळे अतिगर्दीच्या मार्गांवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. उभ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होणार आहे. दोन शहरांमधील मुख्य तसेच तालुका मार्गांवर या बससेवा प्राधान्याने सुरू करण्यात येणार आहेत.

तालुका मार्गांवर धावणार ‘राजमाता जिजाऊ’

जळगाव विभागाला मिळणाऱ्या २५० ‘राजमाता जिजाऊ’ बस प्रामुख्याने सर्व तालुका मार्गांवर धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात मार्च महिन्यात काही बस विभागाला मिळणार असून त्यानंतर जळगाव–जामनेर, जळगाव–चोपडा, जळगाव–चाळीसगाव तसेच विद्यार्थी संख्या अधिक असलेल्या जळगाव–भोकर या मार्गांवर या बस प्राधान्याने सोडल्या जाणार आहेत.

नव्या रंगात लालपरी

एसटीच्या ताफ्यात यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, हिरकणी यांसारख्या विविध प्रकारच्या बस दाखल करण्यात आल्या आहेत. आता ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या बसच्या रूपाने लालपरी नव्या रंगसंगतीत अवतरत आहे. भगव्या आणि पांढऱ्या रंगातील पट्ट्यांमुळे या बसला वेगळा आकर्षक लूक देण्यात आला आहे.

पुन्हा ५५ आसनी बसचा प्रवास

राज्य परिवहन महामंडळाने सुरुवातीला ३० आसनी बससेवा सुरू केली होती. काळानुरूप बदल करत १९६० मध्ये आसन क्षमता ५४ पर्यंत वाढवण्यात आली. या बस जवळपास ४० वर्षे सेवेत होत्या. ८०च्या दशकात सेमी-लक्झरी तर पुढे एसी बससेवा सुरू झाली. २००० सालापर्यंत मागील दरवाजा असलेली लालपरी ५५ आसनी होती. त्यानंतर २ बाय २ आसन व्यवस्था सुरू करण्यात आली.

आता पुन्हा एकदा ५५ आसनी ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेत येत असून, मार्चमध्ये पहिल्या टप्प्यात बस मिळाल्यानंतर जळगाव विभागातील गर्दीच्या मार्गांवर त्या सुरू केल्या जाणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

5 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

5 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

5 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

5 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

7 तास ago

आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमार थांबवा; महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पेपरफुटी प्रकरणावर न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेला कथित लाठीमार अन्यायकारक असून महाराष्ट्रात…

7 तास ago