शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन मधील तायक्वांदो क्रीडा खेळातील खेळाडूंनी शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादित करत विविध पदके पटकावली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये कराटेच्या तायक्वांदो क्रीडा खेळाचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी नुकतेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा परिषद कार्यालय पुणे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता.
यावेळी आयोजित स्पर्धेत अनिकेत संतोष चौगुले, सुशांत सुभाष लेव्हरकर, ऋषिकेश सोपान पानसरे, श्रीयश विलास सातारे, अमन राजू धायत, जितेंद्र रामकिशोर धायत या खेळाडूंनी सुवर्णपदक तर रोहन गोविंद खरात व चिरायू बालाजी चलसानी या दोघांनी रौप्यपदक आणि संदेश धनराज मुरकुटे, प्रतीक राजशेखर बिराजदार, यश राजेंद्र अडसूळ, आर्यश दिलीप पाटील, अभिषेक राजेंद्र नवले या खेळाडूंनी कांस्यपदक पटकावले आहे.
आयोजित शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो खेळामध्ये आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन शिक्रापूर च्या सहा खेळाडूंची शालेय विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व खेळाडूंना आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. निखिल दत्तात्रय गिरमकरयांसह आदींनी मार्गदर्शन केला आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…