शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर या कालावधीत शासनाच्या निर्देशानुसार सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असुन या उपक्रमांतर्गत गावोगावी स्वच्छता, विकास आणि जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील धामारी (ता. शिरूर) गावाची निवड करण्यात आली असुन शेत व पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण व जिओ-टॅगिंगचे महत्त्वाकांक्षी काम सुरू आहे.
धामारी गावातील एकूण ३५ रस्त्यांचे सर्वेक्षण आणि मोजणी पूर्ण करण्यात आली असून रस्त्यांना संकेतांक क्रमांक देणे, नकाशावर दिशा दर्शविणे आणि रस्त्यांवर नावफलक लावणे या कामाची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू आहे. या उपक्रमामुळे गावातील प्रत्येक रस्ता शासनाच्या नोंदवहीत स्पष्ट होणार असून भविष्यात विकासकामे, दळणवळण व्यवस्था तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा अधिक वेगाने आणि पारदर्शकतेने राबवता येतील.
या कामाचे सादरीकरण नुकतेच पुण्यात मुख्यमंत्री, महसूल मंत्री व जिल्हा पालकमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रकल्पाला शासन पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने धामारी गाव राज्यातील आदर्श प्रकल्प म्हणून पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या उपक्रमासाठी शिरूर उपविभागीय अधिकारी पुनम अहिरे व तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी मार्गदर्शन केले. तर पाबळ मंडळ अधिकारी प्रमोद लोखंडे यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण व सादरीकरणाची जबाबदारी पार पाडली.स्थानिक ग्रामस्थांमध्ये या उपक्रमामुळे उत्साहाचे वातावरण असून, शासन-प्रशासनाच्या या प्रयत्नामुळे गावातील रस्त्यांची अचूक नोंद व शाश्वत विकास साध्य होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…