मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात गुटखा माफियांना अभय, पोलिसांच्या निष्क्रीयतेविरोधात संतापाची लाट

सुभाष जगताप २९ सप्टेंबरला लाक्षणिक उपोषण, ३० पासून बेमुदत आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गुटखा व नशेली पान विक्रीचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून, तरुणांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखा बंदीचे आदेश जारी करूनही गावोगावी, महामार्गावरील हॉटेल-ढाबे व पानटपऱ्यांवर उघडपणे गुटखा विक्री सुरू आहे. परंतु या बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करण्याऐवजी संबंधित पोलिस अधिकारी व बीट अंमलदार माफियांना अभय देत असल्याचा थेट आरोप ग्रामीण विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष सुभाष खंडेराव जगताप यांनी केला आहे.

२९ सप्टेंबर २०२५: तहसील कार्यालय शिरूर येथे लाक्षणिक उपोषण, ३० सप्टेंबर २०२५ पासून बेमुदत आत्मक्लेश आंदोलनकरणार असल्याचे सुभाष जगताप यांनी सांगितले

शिरूर तालुक्यात गुटखा व नशेली पान विक्रीवर तात्काळ बंदीचे आदेश निर्गमित करावेत.गुटखा विकणाऱ्या व्यक्तींवर कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी. गुटखा माफियांना संरक्षण देणारे व जबाबदारीत कसूर करणारे शिरूर, शिक्रापूर व रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यांतील अधिकारी व बीट अंमलदारांना निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करावी.शिक्रापूर पोलिस ठाण्यातील गोपनीय कामकाज सांभाळणारे व अवैध्य धंद्यांकडून वसूली करून अभय देणारे संदीप कारंडे यांची तात्काळ बदली व विभागीय चौकशी करावी अशी लेखी मागणी जगताप यांनी निवेदनात दिली आहे.

गुटखा विक्रीवर बंदी असतानाही तालुक्यात मोकाट धंदा सुरू आहे.पोलिस ठाण्यांचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गुटखा माफियांना संरक्षण देत आहेत.आंदोलन करू नये व वरिष्ठांकडे तक्रार जाऊ नये यासाठी स्वतःवर मानसिक दबाव, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.”जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या यंत्रणेने लोकांचा विश्वास गमावला आहे. कुंपणच शेत खात असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.”

या आंदोलनाबाबतची माहिती जगताप यांनी थेट राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्यापर्यंत पोचवली आहे.शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये याबाबत प्रचंड संताप असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास हा संताप रस्त्यावर उसळेल, असा इशारा सुभाष जगताप यांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

18 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago