शिरूर तालुका

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षभर जागर करणार: अविनाश क्षीरसागर

शिक्रापूर: भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण होत असताना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे विचार आणखी प्रभावीपणे रुजवण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करत क्रांतिकारकांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे खजिनदार प्राचार्य अविनाश क्षीरसागर यांनी केले.

पाबळ (ता. शिरुर) येथील भैरवनाथ विद्यामंदिर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्राचार्य अविनाश क्षीरसागर बोलत होते. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक तुकाराम ताम्हाणे, भैरवनाथ विद्यामंदिर सेवक सहकारी पतसंस्थेचे संचालक रोहिदास चौधरी, आनंदा गावडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष जितेंद्रकुमार थिटे, आण्णा ओहोळ, निळकंठ पाटील, काळूराम गव्हाणे, संदीप गवारे, अरुण निकम, अतुल लिमगुडे, किरण रेटवडे, सुनिल जाधव, देवा शेळके, भरत जाधव, रेखा पलांडे, रोहिणी जाधव, विजया धुमाळ, जयश्री कोहीनकर, शितल सरोदे, कीर्ती कापरे, कल्पना चौधरी, अश्विनी यादव यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

विद्यालयातील ऋतुजा मैड, साक्षी थिटे, वैष्णवी फटांगडे, श्रृतिका चापोडे, साक्षी आदक या विद्यार्थिनींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. तर यावेळी बोलताना स्वातंत्र चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व विचारवंत, साहित्यिक, कवी, प्रबोधनकार, समाज सुधारक अशा विविध प्रांतात काम करणारे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी गर्जना करत सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करुन देणारा स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार, थोर समाजसेवक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे विचार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपप्राचार्य सुदाम पिंगळे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष क्षीरसागर यांनी केले. तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष जितेंद्रकुमार थिटे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

20 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago