महाराष्ट्र

महागाईची झळ! सीएनजी, पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ…

पुणे : नागपूर नंतर मुंबईत सीएनजी महागला असून, पुण्यात आज (गुरुवार) सीएनजीचा दर वाढला आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पुण्यात पुन्हा एकदा इंधन दरात वाढ झाली आहे.

पुण्यात सीएनजी तब्बल 6 रुपयांनी महागला आहे. आता पुण्यात एक किलो सीएनजीमागे 91 रुपये मोजावे लागणार आहेत. तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही प्रत्येकी 8 पैशांची वाढ झाली आहे. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कमी करुन महिनाही झाला नाही. मात्र त्याआधीच पुन्हा इंधनाचा भडका उडाला आहे.

पुण्यात आजपासून पेट्रोल 106 रुपये तर डिझेल 92 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी महागणार आहे. आधीच महागाईत होरपळून निघणाऱ्यांना इंधन दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे.

दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) सीएनजीच्या किमतीत बुधवारपासून प्रति किलो 6 रुपयांनी वाढ झाली असून, ती 86 रुपये प्रति किलो या उच्चांकावर पोहोचलाआहे. पाईपयुक्त स्वयंपाकाच्या गॅसची किंमत प्रति युनिट 4 रुपयांनी वाढणार आहेत. तसेच 52.50 रुपये प्रति युनिट अशी विक्रमी पातळी गाठेल, ज्यामुळे संपूर्ण MMR मधील 19 लाख घरांवर परिणाम होईल. सीएनजीसाठी, 13 महिन्यांतील ही अकरावी वाढ आहे, गेल्यावर्षी जुलै ते या वर्षी ऑगस्ट दरम्यान एकूण 36 रुपये प्रति किलो वाढ झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

10 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

14 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

14 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

14 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

14 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

14 तास ago