शिरूर तालुका

कोरेगाव भीमा येथे शासन आपल्या दारीचा उडाला बोजबारा

शासकीय विभागांना चक्क माहिती नाही व गावात दवंडीही नाही

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे शिरुर तहसील कार्यालयच्या वतीने तालुक्यातील सर्व विभागांना एकत्र करुन शासन आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात आला असताना या उपक्रमाचा बोजबारा उडाल्याचे प्रकर्षाने दिसत असतानाच शासकीय विभागांनाच कार्यक्रमाची माहिती नव्हती तर गावात दवंडी देण्याचे आदेश असताना महसुल विभाग व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिरुर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासुन नागरिकांची शासकीय कामे मोठ्याप्रमाणात खोळंबली होती. नागरिकांच्या अडचणी समस्या मार्गी लावण्यासाठी शिरुर तहसील कार्यालयामार्फत शासन आपल्या दारी या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार नुकतेच गौरीनंदन मंगल कार्यालयामध्ये शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक वैभव पवार, मंडल अधिकारी विकास फुके, राजु आळणे, विस्तार अधिकारी रामेश्वर राठोड, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या कारंडे, शिरुर वनविभागाचे वनरक्षक बबन दहातोंडे यांच्यासह विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सेतु विभाग एवढ्याच विभागाचे कामकाज सुरु झाले होते.

कोरेगाव भीमा पासुन तब्बल 3 किलोमिटर अंतरावर असणाऱ्या शासन आपल्या दारी अभियानाची प्रसिध्दी करण्यासाठी दोन्ही मंडल क्षेत्रातील असणाऱ्या गावांमधील तलाठी व ग्रामसेवकांना उपक्रमाची दवंडी देण्याचे आदेश असताना तळेगाव ढमढेरे व कोरेगाव भीमा या दोन्ही मंडल क्षेत्रातील तलाठी व ग्रामसेवकांनी या आदेशाला केराची टोपली दाखविल्याने नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या नावाखाली शासन आपल्या दारीचा केवळ फार्स केला असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी यावेळी मांडल्या.

झेरॉक्स फॉर्मसाठी अवाच्यासवा रक्कम…

कोरेगाव भीमा येथे शासन आपल्या दारी उपक्रमासाठी विविध शासकीय विभागांसाठी लागणाऱ्या अर्जांसाठी यावेळी दहा रुपये रक्कम आकारण्यात येत होती व हा सर्व प्रकार शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर सुरु असतानाही हा प्रकार न थांबल्याने यास कोणाचा वरदहस्त आहे हा प्रश्न निर्माण होत असुन आधार कार्ड मशिन दिड वाजता सुरु झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.

शासन आपल्या दारी उपक्रमात ७१८ अर्ज दाखल…

तळेगाव ढमढेरे व कोरेगाव भीमा मंडलक्षेत्रात आयोजीत केलेल्या शासन आपल्या दारी उपक्रमात आरोग्य विभागाचे ३९८, पशु संवर्धन विभाग ६०, महावितरण ५, आधार कार्ड २५, महसुल विभाग २१२, बांधकाम विभाग ८, वनविभाग ३९, कृषी विभाग १०, सेतु विभाग १० अर्ज व लोकांना माहिती दिल्याचे नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी सांगितले.

शासकीय विभागांनी फिरवली पाठ…

महावितरण व पोलीस यंत्रनेला शासन आपल्या दारी उपक्रमाची कल्पनाच नव्हती याबाबत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक वैभव पवार यांना समजल्यानंतर ते उपक्रमास हजर झाले, तर महावितरणचे शाखा अभियंता बसवराज बिराजदार यांनी कर्मचारी पाठविला तर भूमिअभिलेख, पाठबंधारे विभाग, पुरवठा विभाग, ज्येष्ठ नागरिक पास या विभागांनी या उपक्रमाकडे पाठ फिरविल्याने शासन आपल्या दारी उपक्रमाचा बोजबारा उडाला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी "ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?" या शीर्षकाची एक व्यंगात्मक…

2 तास ago

सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे…

2 तास ago

झोपण्यापूर्वी पाणी अवश्य प्यावे

अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे…

2 तास ago

पापणी फडफडण्यामागील ‘8’ कारण

eye twitching म्हणजे नेमके काय अचानक डोळा लवणे किंवा फडफडणे हे तसं खूपच सामान्य लक्षण…

2 तास ago

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत नवीन संधी व अधिकार मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण…

2 तास ago

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

13 तास ago