शिरूर तालुका

पतीने स्वतःची किडणी पत्नीला देवूनही वाचवू शकले नाही

शिरुर (अरुणकुमार मोटे): आतापर्यंत तुम्ही बहीनीला, आईला, मुलाला, भावाला, किडणी दिल्याचे ऐकले असेल. परंतू चक्क आपल्या शिक्षक पत्नीला एका शिक्षकाने आपली किडणी देवून पत्नीधर्म निभावून पत्नीच्या प्रेमापोटी जीव वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता. परंतू नियती पुढे कोणाचेही काही चालत नाही. किडणी देवूनही पत्नीचे दुखःद निधन झाल्याने शिरुर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

करडे (ता. शिरुर) येथील रहिवाशी व कारेगाव येथिल शिक्षिका चंदाराणी शिवाजीराव वाळके यांचे वयाच्या ५२ वर्षी आजाराने दुखद निधन झाले आहे. दोन्ही किडनी निकामी झाल्याने त्या आजाराने ग्रस्त होत्या .त्यांचे पती शिवाजीराव वाळके हे शिक्षक संघटनेत पदाधिकारी असून त्यांनी अनेक वर्ष पत्नीच्या आजारासाठी डॉक्टरकडे शर्थीचे प्रयत्न केले.

परंतु पत्नी च्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने आजार आटोक्यात येइना शेवटी आजार आटोक्यात न आल्याने त्यांनी स्वतः ची किडनी पत्नी साठी द्यायचे ठरवले. डॉक्टर यांच्याशी चर्चा केल्यानंतर १९ जुलै २०२२या तारखेला शस्रक्रिया यशस्वी झाली. पत्नीचे प्राण वाचवून स्वतः ची किडनी देवून त्यांनी पत्निधर्म निभवला. समाजासमोर आदर्श ठेवून एकमेव आदर्श पती चे उदाहरण म्हणून समाजासमोर आहे.

थोड्या काळात हे दांपत्य सुखी जीवन जगत असताना नियातीला हे पसंत नसल्याने अचानक पत्नीची प्राणज्योत मालवली. पती शिवाजीराव वाळके यांनी पत्नी ला एक किडनी देवून समाजासमोर मोठा आदर्श ठेवला. परंतु (दि. ३०) नोव्हेबर रोजी पत्नीचे निधन झाले. या वाइट घटनेने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सर्व शिक्षकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यांच्या पश्चात एक मुलगा व भाऊ आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

20 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

20 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

20 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago