क्राईम

पाबळमध्ये पोलिसांत तक्रार दिल्याने युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल झालेल्या असताना तक्रारी मध्ये नाव का दिले असे म्हणून एका युवकाने भावकीतील एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अभिजित रघुनाथ पिंगळे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथे सोमनाथ पिंगळे व मिनिनाथ पिंगळे या दोन कुटुंबात जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याने दोन्ही कुटुंबांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी गुन्हे दाखल केले त्यामध्ये अभिजित पिंगळे याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल असल्याने मंगेश पिंगळे हा त्याच्या गॅरेज मध्ये असताना अभिजित पिंगळे त्याच्या ताब्यातील एम एच १२ ए पी ००९० या पिकअप मधून मंगेशच्या गॅरेज समोर लाकडी दांडके घेऊन आला आणि मंगेशला शिवीगाळ दमदाटी करत केस मध्ये माझे नाव कोणी घेतले, असे म्हणून तुझ्या सकट तुझ्या घरच्यांना जिवंत ठेवत नाही, असे म्हणून बेदम मारहाण करत जखमी केले.

याबाबत मंगेश मिनिनाथ पिंगळे (वय २४) रा. माळतळवस्ती पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अभिजित रघुनाथ पिंगळे (वय २५) रा. माळतळवस्ती पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

47 मिनिटे ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

51 मिनिटे ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

56 मिनिटे ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

4 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

13 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

13 तास ago