शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे वारंवार बिबट्याचे जनावरांवर हल्ले तसेच नागरिकांना दर्शन होत असताना नुकताच एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे.
करंदी (ता. शिरुर) येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असताना नागरिकांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी केली असता शिरुर वनविभागाच्या वतीने येथील राहुल ढोकले यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आलेला होता. ढोकले हे शेतात गेले असता त्यांना सदर पिंजऱ्यात बिबट्या अडकला असल्याचे दिसून आले.
याबाबतची माहिती मिळताच शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपाल प्रवीण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, पोलीस पाटील वंदना साबळे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर, गणेश टिळेकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे, राहुल ढोकले, राजीरंग ढोकले, रोशन आवटे, सचिन दरेकर, पप्पू झेंडे, राहुल दरेकर यांच्या मदतीने सदर बिबट्याला जुन्नर येथील बिबट निवारण केंद्रात हलविले.
दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद जेरबंद झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून वनविभागाने पुन्हा पिंजरा लावून येथे असलेल्या अजून एका बिबट्याला पकडून न्यावे, अशी मागणी नागरिक व ग्रामस्थ करत आहे.
शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…
मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…