शिरूर तालुका

शांताई उद्योग समूहाची सावली हरपली…

दिलीप सोदक यांना मातृ शोक 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शांताई उद्योग समूहाचे अध्यक्ष दिलीप सोदक यांच्या मातोश्री शांताबाई नाथू सोदक यांचे बुधवारी (दि. ४) रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

मोठा मुलगा पोपट याचे एकोणीस वर्षापूर्वी आणि पतीचे अकरा वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी खांद्यावर पेलवून त्यांनी पुणे जिल्ह्यातील एक नावाजलेला शांताई उद्योग समूह सक्षमपणे चालविण्यास मुलगा दिलीप व कुटुंबास मोलाची साथ दिली.

त्यांच्या पश्चात मुलगा दिलीप नाथू सोदक, तीन मुली सुषाबाई विठ्ठल कांदळकर, अलका सावकार घोडे, उषाबाई विठ्ठल कांदळकर, दोन सूना यमुना पोपट सोदक, विमल दिलीप सोदक आणि नातवंडे राहुल पोपट सोदक, अंकुश पोपट सोदक, निलेश दिलीप सोदक, वर्षा विकास घोडे असा मोठा परिवार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

6 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

6 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

6 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

21 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago