शिरूर तालुका

आंबळे येथील तानाजी धरणे यांचे ‘हेलपाटा’ कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर…

शिरूरः शिरूर तालुक्यातील आंबळे गावचे सुपुत्र आणि रायगड जिल्ह्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले तानाजी धरणे यांची हेलपाटा ही कांदबरी प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने…

तानाजी धरणे हे आमच्या गावात जन्माला आलेलं आणि तावून सुलखून निघालेलं बावनकशी सोनं आहे. आत्तापर्यंतचा त्यांचा साहित्य क्षेत्रातील प्रवास सृजनशील कवी/गीतकार म्हणून पाहिला आहे. त्यांचे काही कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत तर काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या कवितांनी रसिक वाचकांच्या मनात एक आगळं वेगळं गारुड निर्माण केलं आहे.

परंतु आज त्यांची हेलपटा ही अस्सल ग्रामीण मराठी कादंबरी (आत्मकथन) वाचल्यानंतर माझ्यासहित प्रत्येक वाचकांचे मन भूतकाळात रमाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप सारे भलेभुरे अनुभव येत असतात.हे स्वानुभव व्यक्त करण्याचे अनेक प्रकार आहेत.त्यामध्ये लेखक तानाजी धरणे यांनी लेखनीचा वापर केला. स्वतः लेखक आणि त्यांच्या परिवाराने पोटाचं खळग भरण्यासाठी उपासलेले कष्ट वाचून नकळत डोळ्याची कड आपोआपच ओली होते आणि लेखक प्र. ई. सोनकांबळे सरांच्या आठवणीचे पक्षी या आत्मकथनाची आठवण येते.

एकेकाळी ओसाड माळरान असलेल्या आनोसेवाडीच्या भूमिमध्ये जन्माला आलेलं हे रत्न साहित्य निर्मिती मध्ये हरवून गेलं आहे.साहित्य निर्मितीची आवड असल्यामुळे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असतानाही आपल्या कर्तव्याचे जाणीव ठेवून साहित्य निर्मितीसाठी एक छंद म्हणून वेळ देत आहे. त्यांच्या साहित्या निर्मितीला कोकणातील महाडच्या भूमीचा सोनपरीस लाभल्यामुळे त्यांची लेखनशैली बहरात गेली व त्यातूनच हेलपटा ही अस्सल ग्रामीण बाज असणारी कादंबरी निर्माण झाली. लेखक तानाजी धरणे यांच्या या कादंबरीचे वाचन करत असताना ज्या रसिक वाचकांनाही बालपणी परिस्थितीचे चटके सोसले त्यांना त्या चांगल्या वाईट प्रसंगाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही असे मला तरी वाटते. असो.

आमचे ग्रामवासी मित्र तानाजी धरणे यांच्या साहित्य क्षेत्रातील गरुडभरारीला आनोसेवाडी, आंबळे ग्रामवासियांच्या वतीने तसेच पुणे जिल्ह्यात शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचवणारे कै. बाबुराव रामचंद्र घोलप साहेब यांनी स्थापन केलेल्या श्री भैरवनाथ माध्य. व उच्च माध्य. विद्यालय करडे या विद्यालयातील सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

– श्री. विष्णू संकपाळ सर
सेवानिवृत्त अध्यापक.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

21 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

21 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

21 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago