शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील त्या शेतकऱ्यांचा विद्युत वितरणवर मोर्चा

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) सह परिसरात विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांनी कृषी पंपाच्या वीज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केल्याने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात असून काही ठिकाणी विद्युत रोहित्रच बंद केले जात असल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा काढून विद्युत वितरण विभागाचा निषेध नोंदवला आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) सह परिसरात विद्युत वितरण विभागाकडून शेतकऱ्यांच्या वीजबिल वसुली साठी वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरु असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्या अभावी जाळून चालली असून शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने नुकतेच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता.

यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास ढमढेरे, सोपान गवारे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण भुजबळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदीप गुंदेचा, माजी उपसरपंच विजय ढमढेरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कैलास नरके, राजेंद्र घुमे, बंडोबा जेधे, रमेश भुजबळ, किरण शिंदे, पोपट ढमढेरे, अक्षय ढमढेरे, विकास भुजबळ, राजेंद्र तोडकर, पोलीस पाटील पांडुरंग नरके यांसह आदी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन विद्युत वितरण विभागाने कट करु नये आणि खंडित केलेले वीज कनेक्शन पुन्हा सुरु करावे तसेच शेतकऱ्यांच्या बिलावर येणारी कृषीपंपाची वाढीव एच पी कमी करावी, अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली असून याबाबत विद्युत वितरण विभागाचे तळेगाव ढमढेरे विभागाचे शाखाधिकारी दादा बारवकर यांना निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांनी सहकार्य करावे; नितीन महाजन

सध्या वरिष्ठ कार्यालयांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येत असून शेतकऱ्यांनी चालू वीज बिल भरुन विद्युत वितरण विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

5 तास ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

6 तास ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago