शिरूर तालुका

माहेर संस्थेत तीन विशेष दाम्पत्यांचे विवाह थाटात संपन्न…

अनाथांच्या माहेर संस्थेतून झाले आत्तापर्यंत तब्बल १९२ विवाह

शिक्रापूर (शेरखान शेख): वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाथ मुले, मुली यांसह महिलांसाठी कार्यरत असलेल्या माहेर संस्थेने आज पर्यंत बरेच अनाथ निराधार युवती व विधवा महिलांचे विवाह सोहळा साजरे केले असून नुकतेच माहेर संस्थेतील तीन विशेष पुरुष व तीन विशेष महिलांचे विवाह थाटात संपन्न झाले असून तिघा पुरुष व महिलांना आयुष्यभराचे जोडीदार मिळाले आहेत.

वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेमध्ये अनेक अनाथ युवक, युवती बालके आश्रय घेत असताना काही दिवसांपूर्वी विशेष मुलांसह पुरुषांसाठी देखील कार्य हाती घेत विशेष पुरुषांसाठी करुणालया प्रकल्प सुरु करण्यात आला तर महिलांसाठी वात्सल्यधाम प्रकल्प सुरु करण्यात आला असताना काही दिवसांपूर्वी येथे विशेष महिला पुरुष दाखल झालेले असताना राजकुमार गोयल, अंकुश काळे व सुनील ढाकणे त्यांनी देखील विवाह करण्याची इच्छा माहेर संस्थेच्या संस्थापिका असलेल्या जगातील प्रेरणादायी व्यक्तींच्या यादीतील लुसि कुरियन यांच्याकडे व्यक्त केली असताना त्यांनी करुणालया व वात्सल्यधाम प्रकल्पा तील महिला पुरुषांची चर्चा करत तिघांचा विवाह पंचफुला भालेराव, सुजाता पगारे व मंदा पवार यांच्याशी करण्याचा निर्णय घेतला असताना तिघांचे देखील विवाह मधुसुदन गुरुजी व जोशी काका यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यावेळी माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरीयन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, माहेर संस्थेचे व्यवस्थापक रमेश चौधरी, रमेश दुतोंडे, विजय तवर, आनंद सागर, तेजस्विनी पवार, स्वाती पाटील यांसह आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. सदर विवाह यशस्वी होण्यासाठी माहेर संस्थेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

5 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

5 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

7 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

11 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

11 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

11 तास ago