शिरूर तालुका

तळेगाव ढमढेरे गुजर प्रशालेच्या बावीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

राष्ट्रीय शिष्यवृत्तीस आठ व सारथीसाठी चौदा विद्यार्थी लाभार्थी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादित केले असून राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत 8 तर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत 14 विद्यार्थी पात्र ठरलेले असताना यापैकी राष्ट्रीय शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांना 5 वर्षे दरवर्षी 12 हजार तर सारथी शिष्यवृत्तीतील विद्यार्थ्यांना 4 वर्षे दरवर्षी 9 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण यांनी दिली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केले असून राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत सार्थक कावळे, अस्मिता ढोले, श्वेता लाड, आर्यन भालेकर, निखील बढे, युवराज शिंदे, ख़ुशी भुजबळ, ईशान काळे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

सर्व विद्यार्थ्यांना 5 वर्षे प्रत्येक 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे, तर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानदेव खैरे, वैष्णवी शिंदे, तन्मय रामगुडे, आर्या ढमढेरे, संस्कृती जाधव, श्रेया ढमढेरे, अक्षरा भोसले, मंजुश्री आढाव, हर्षवर्धन ढमढेरे, श्रावणी गायकवाड, श्लोक जगताप, अंतरा पठारे, प्राजक्ता कोंडे, अविष्कार गावडे या विद्यार्थांनी यश मिळवले.

सर्व विद्यार्थ्यांना अलका सातपुते, रवींद्र सातपुते, सुरेंद्र ठुबे, अर्चना गोरे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले तर सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनिता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांतसातपुते, संचालक विजय ढमढेरे, महेश ढमढेरे यांसह आदींनी अभिनंदन केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगावला भाविकांची अलोट गर्दी…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील श्री…

5 तास ago

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या…

शिरुर (तेजस फडके) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

12 तास ago

Video: अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिला…

नवी दिल्ली : अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…

1 दिवस ago

कोरेगाव भीमा येथील फरशी ओढ्याजवळ बिबट्याने पळवला बोकड…

कोरेगाव भीमाः कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे फरशी ओढ्याजवळ पद्माकर देवराम ढेरंगे यांच्या गोठ्यावरील पूर्ण…

2 दिवस ago

रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत किरकोळ कारणातून युवकाचा खून…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात मित्राला केलेल्या शिवीगाळचा जाब विचारायला गेलेल्या युवकाला अज्ञात…

3 दिवस ago

लोणीकंद थेऊर फाटा वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा…

लोणीकंदः लोणीकंद (ता. हवेली) येथे थेऊर फाटा वळणाला कोरेगाव भीमा कडे येणाऱ्या बाजूला व रस्त्याच्या…

4 दिवस ago