शिक्रापूर (शेरखान शेख): वाडा पुनर्वसन (ता. शिरुर) येथे किरकोळ वादातून हातात कोयता घेऊन महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत महिलेसह महिलेच्या पतीला शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चंद्रकांत ज्ञानेश्वर ढोरे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वाडा पुनर्वसन (ता. शिरुर) येथे चंद्रकांत ढोरे याने त्याच्या पत्नीशी वाद घालत शिवीगाळ दमदाटी केली, त्याचवेळी रेखा ढोरे या घरी आलेल्या असताना चंद्रकांत याने हातात कोयता घेऊन रेखा यांसह त्यांच्या पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान रेखा यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फोन करुन पोलिसांची मदत मागवून घेत पोलीस स्टेशन गाठले.
याबाबत रेखा सुधीर ढोरे (वय ३२) रा. वाडापुनर्वसन कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी चंद्रकांत ज्ञानेश्वर ढोरे (वय ४६) रा. वाडापुनर्वसन कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक राणी भागवत करत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…