शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका महिलेचे अश्लील चित्रीकरण करत महिलेला सदर व्यक्ती सोबत राहण्यासाठी धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे धनराज मधुकर डोंगरे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात राहणाऱ्या महिलेची ओळख धनराज डोंगरे याच्या सोबत झालेली होती. त्यानंतर महिला घरी असताना धनराज याने महिलेचे अश्लील चित्रीकरण केले. त्यानंतर महिलेला त्याच्या सोबत राहण्यासाठी दमदाटी करत महिलेला तिचे अश्लील चित्रीकरण दाखवले. तसेच सदर अश्लील चित्रीकरण नातेवाईकांना प्रसारित करण्याची धमकी देऊ लागला. त्यानंतर महिलेने त्याचा मोबाईल पाण्यात टाकून दिला.
याबाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली अल्स्याने शिक्रापूर पोलिसांनी धनराज मधुकर डोंगरे (वय ३०) रा. चारदरी ता. धारुर जि. बीड याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश करपे हे करत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…